एक्स्प्लोर

मालिका विश्वात 'सुख म्हणजे नक्की काय असतं'

महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. नव्यानं सुरु होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिका साकारणार आहेत.

मुंबई : स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेची निर्मिती केली असून या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. मुहूर्ताच्या या खास प्रसंगी कलाकारांसोबतच सेटवर महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते. देवीचा आशिर्वाद घेऊन आणि सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.

नव्यानं सुरु होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिका साकारणार आहेत. गिरीजानं यापूर्वी डॅड चीअर्स, काय झालं कळना सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गिरीजानं साकारलेल्या भूमिकेचं नाव गौरी शिंदे असं आहे. भूमिकेबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, 'खूप मोठी जबाबदारी आहे. आमचे दिग्दर्शक चंद्रकांत पाटील यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रमुख भूमिका असलेली ही पहिलीच मालिका असल्यामुळे खूप उत्सुकता आहे'.

मालिका विश्वात 'सुख म्हणजे नक्की काय असतं

तर अभिनेता मंदार जाधव स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारताना आपल्याला दिसला होता.. 'सुख म्हणजे..' या मालिकेत तो जयदिप यशवंत शिर्के पाटील ही भूमिका साकारतोय. श्री गुरुदेव दत्त मालिकेतल्या मंदारच्या लूकचं खूपच कौतुक झालं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील त्याचा लूकही लक्षवेधी असणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, श्री गुरुदेव दत्त नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची मालिका करतोय याचा प्रचंड आनंद आहे. कोल्हापूरात घडणारी ही गोष्ट आहे. जयदीप असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव असून तो परदेशात शिकलेला मुलगा आहे. जयदीप अन्यायाविरोधात नेहमी उभा ठाकतो आणि हेच त्याचं वेगळेपण आहे. आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई याचं उत्तम उदाहरण म्हणून जयदीप या पात्राचा उल्लेख करता येईल. श्री दत्तांच्या रुपात प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं त्यामुळे नव्या मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.

मालिका विश्वात 'सुख म्हणजे नक्की काय असतं Mandar Jadhav

गेल्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीचा टिआरपी सगळ्यात जास्त होता. त्यामुळे याच आठवड्यात त्यांनी त्यांच्या या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. आता मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरु झाल्याचा आणि येणाऱ्या या नव्या मालिकेचा स्टार प्रवाह वाहिनीला असाच फायदा होतो का ते पहावं लागेल.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget