Naseeruddin Shah : 'मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते': नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य
अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Naseeruddin Shah : काही दिवसांपूर्वी हरिद्वार (Haridwar) येथील धर्मसंसद वादग्रस्त वक्तव्यानं गाजली. यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. देशात एका प्रकारे गृहयुद्धसारखं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही नसिरुद्दीन शाह म्हणालेत. त्यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य
मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. एका मुलाखतीत नसिरुद्दीन यांनी सांगितले, 'मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशात 20 कोटी मुस्लिम आहेत, ते घाबरणार नाहीत तर लढतील' पुढे ते म्हणाले, ' मुस्लिमांमध्ये जरी भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मुस्लिम हार मानणार नाहीत. मुस्लिमांना याचा सामना करावा लागेल कारण आपल्याला आपले घर वाचवायचे आहे, आपल्याला आपली मातृभूमी वाचवायची आहे, आपल्याला आपले कुटुंब आणि मुलांना वाचवायचे आहे.'
काय म्हणाले नसिरुद्दीन शाह? पाहा व्हिडीओ
1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम पांच' या चित्रपटांमधून नसिरुद्दीन शाह यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मासूम, कर्मा, इजाज़त, जलवा, हीरो हीरालाल, गुलामी, त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा गर्ल इन येलो बूट्स, डर्टी पिक्चर, 7 खून माफ, तेरा सुररूर या चित्रपटांमधील नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
संबंधित बातम्या
Viral Video : भाईजान झाला 'रिक्षावाला', Salman Khan ने पनवेलमध्ये चालवली ऑटो रिक्षा
Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha