Ms Marvel Trailer : कमला खानवर आधारित ‘मिस मार्वल’चा ट्रेलर रिलीज! ‘या’ दिवशी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Ms Marvel Trailer : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिरीजच्या ट्रेलरमध्ये जर्सी शहरातील 16 वर्षीय पाकिस्तानी-अमेरिकन सुपरहिरो ‘कमला खान’ची ओळख करून देण्यात आली आहे.
Ms Marvel Trailer : मार्वल स्टुडिओने (Marvel Studios) त्यांची बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिस मार्वल’चा (Ms Marvel) अधिकृत ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री इमान वेलानी (Iman Vellani) ‘कमला खान’च्या (Kamala Khan) भूमिकेत दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिरीजच्या ट्रेलरमध्ये जर्सी शहरातील 16 वर्षीय पाकिस्तानी-अमेरिकन सुपरहिरो ‘कमला खान’ची ओळख करून देण्यात आली आहे. ट्रेलर रिलीज करण्यासोबतच मार्वल स्टुडिओने या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.
सना अमानत, स्टीफन वॅकर, जी. विलो विल्सन, एड्रियन अल्फोना आणि जेमी मॅकेल्वी यांनी तयार केलेले मार्वल कॉमिक्स पात्र ‘कमला खान’वर आधारित आहे. मार्वल युनिव्हर्समधली ही पहिलीच मालिका असेल ज्यामध्ये मुस्लिम सुपरहिरो दाखवण्यात आला आहे. बुधवारी रिलीज झालेल्या एक मिनिट 1.47 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये ‘मिस मार्वल’ आतापर्यंतची अनोखी कहाणी जगासमोर मांडणार असल्याचे दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ :
कोण आहे ‘मिस मार्वल’?
‘मिस मार्वल’ची निर्मिती बिशा के अली यांनी केली आहे. हे मार्वल पात्र कॉमिक्स कमला खानच्या पात्रावर आधारित आहे. कमला खान ही एक मुस्लिम अमेरिकन मुलगी आहे, जी तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत सुपरहिरो बनते. मार्वल कॉमिक्समधील ती पहिली मुस्लिम सुपरहिरो आहे. सध्या, मिस मार्वलचा ट्रेलर रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या ट्रेलरला यूट्यूबवर अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
मार्वल युनिव्हर्समधली या सिरीजमध्ये इमान वेलानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर सागर शेख, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ, झेनोबिया श्रॉफ आणि मोहन कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहेत. सहा भागांची ही सिरीज 8 जूनपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
- Mishan Impossible : तापसी पन्नूच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर आऊट
- Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha