एक्स्प्लोर

‘धुरंधर 2’ ठरणार पहिल्यापेक्षा वादळी? रणवीर सिंहचा नवा अवतार बॉक्स ऑफिस हादरवणार; या 5 कारणांमुळे वाढली उत्सुकता

पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी असला तरी कथानकातील थरार कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशानंतर आता ‘धुरंधर 2’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला, त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल किती मोठा ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी असला तरी कथानकातील थरार कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ‘धुरंधर 2’ पाहण्याची पाच मोठी कारणे.

1. रणवीर सिंहचा दमदार अवतार

रणवीर प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा दाखवतो. ‘धुरंधर’मधील त्याचा लूक आणि अॅक्शन प्रेक्षकांना भावला होता. सिक्वेलमध्ये त्याचा आणखी अवतार आणखी आक्रमक असेल असे सांगण्यात आले आहे. 

2. स्टारकास्टची मजबूत कामगिरी

पहिल्या भागातील कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला मोठे यश मिळाले. यावेळीही कलाकारांची प्रभावी कामगिरी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा आहे. शिवाय चित्रपटांमध्ये असणारी धमाकेदार आणि खिळवून ठेवणारी ऍक्शन हे ही महत्वाचे कारण समजले जात आहे.

3. हमजा अली मजारीची पुढची कथा

रणवीर साकारणारा हमजा अली मजारी हा भारतीय गुप्तहेर पाकिस्तानमध्ये गेलेला दाखवण्यात आला होता. दुसऱ्या भागात त्याची खरी ओळख आणि मिशन अधिक स्पष्टपणे उलगडणार आहे.

4. कथेशी प्रेक्षकांचा कनेक्ट

पहिल्या भागाची कथा वास्तवाशी जोडलेली वाटल्याने प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली. त्यामुळे पुढील भागाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5. वाढलेला अॅक्शन आणि थरार

पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर धुमाकूळ घातला. ‘धुरंधर 2’मध्ये आणखी मोठा अॅक्शन स्केल आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळतील, अशी चर्चा आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर माधवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधमांमुळे होळी सणाला गालबोट; व्हिडिओ पाहून संताप, अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, या तरुणांना अटक करा
नराधमांमुळे होळी सणाला गालबोट; व्हिडिओ पाहून संताप, अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, या तरुणांना अटक करा
विशाल अन् रुचिताचं ब्रेकअप होणार? राखीसमोर ती चक्कर येऊन पडली; बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय?
विशाल अन् रुचिताचं ब्रेकअप होणार? राखीसमोर ती चक्कर येऊन पडली; बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय?
चंद्रग्रहणाचं 'धुरंधर 2' वर सावट; निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला, ट्रेलर कधी रिलीज होणार?
चंद्रग्रहणाचं 'धुरंधर 2' वर सावट; निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला, ट्रेलर कधी रिलीज होणार?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget