Money Heist Season 5 Volume 2 : उत्सुकता संपली! अॅक्शन,ड्रामा, थ्रील; मनी हाईस्ट सिझन-5 चा दुसरा पार्ट आज होणार प्रदर्शित
Money Heist Season 5 Volume 2 : सीरिजमधील पाचव्या सिझनच्या दुसरा पार्ट म्हणजेच सिझन-5 व्हॉल्यूम 2 आज प्रदर्शित होणार आहे.
Money Heist Season 5 Volume 2 Release: La Casa de Papel म्हणजेच मनी हाईस्ट या वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली. ओटीटी प्लॅटफोर्मवरील ही सीरिज लॉकडाउनमध्ये अनेक लोक बिंच वॉच करत होते. वेब सीरिजच्या कथानकाने आणि कलकारांच्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधले होते. या सीरिजमधील पाचव्या सिझनचा दुसरा पार्ट म्हणजेच सिझन-5 (Money Heist Season 5 Volume 2) व्हॉल्यूम 2 आज प्रदर्शित होणार आहे. सिझन-5 च्या पहिल्या भागात अनेक ट्वीस्ट दाखवण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते.
मनी हाईस्ट वेब सीरिजच्या सिझन-5 चा व्हॉल्यूम 2 हा पार्ट आज दुपारी 1.30 वाजता नेटफ्लिक्स अॅपवर प्रदर्शित होणार आहे. व्हॉल्यूम 2 मध्ये एकूण 5 एपिसोड असणार आहेत. व्हॉल्यूम 1 सप्टेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. मनी हाईस्टच्या पाचव्या सिझनच्या व्हॉल्यूम 2 या भागाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता.
Money Heist चा हिंदी रिमेक येणार?
वेब सीरिजचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकचे नाव 'थ्री मंकी' असे असणार आहे, अशी चर्चा आहे. पण अब्बास मस्तान यांनी या चित्रपटाबाबत अजून कोणतीही घोषणा केली नाही. आब्बास मस्तान यांच्या थ्रिलर स्टोरी बेस्ड चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आब्बस यांनी अजनबी, बाजीगर, सोलजर, ऐतराज, हमराज आणि रेस या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकची लोक उत्सुकेने वाट पाहात आहेत. प्रोफेसर, बर्लिन, टोकियो, रकेल, रिओ आणि डेनव्हर्ट या मनी हाईस्टमधील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.