एक्स्प्लोर

मैत्रिणीला शुभेच्छा देताना मयुरी देशमुख झाली भावूक, व्हिडीओ शेअर!

खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आत्महत्या केली आणि मयुरीवर वेदनेचा पहाड कोसळला. त्यानंतर मयुरी जिद्दीने पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे.

मुंबई : लॉकडाऊनने प्रत्येकाला काहीतरी शिकवलं. काहींना धीर धरायला शिकवलं तर काहींना कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवलं. या वर्षात अनेक जबर धक्केही अनेकांना बसले. त्यातला एक होता आशुतोष भाकरेच्या आत्महत्येचा धक्का. खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आत्महत्या केली आणि मयुरीवर वेदनेचा पहाड कोसळला. त्यानंतर मयुरी जिद्दीने पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे. आशुतोषच्या जाण्यानंतर मयुरी सोशल मीडियापासून लांब होती. पण आत एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा द्यायला मयुरी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर परतली आहे.

आपली मैत्रीण श्वेता हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच मयुरीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. श्वेता या आपल्या मैत्रिणीने आपल्याला कसं सांभाळून घेतलं.. आशुतोषलाही कसं समजून घेतलं हे तर तिने सांगितलं आहेच. शिवाय ती किती महत्वाची होती हेही मयुरीने सांगितंल आहे. आशुतोष जेव्हा डिप्रेशन मध्ये होता तेव्हा श्वेता या मैत्रिणीने त्या दोघांना खूप सपोर्ट केला होता आणि आज श्वेताच्या वाढदिवसानिमित्त तिचे आभार मानत असताना आशुतोष विषयी मनात साठलेल्या अनेक आठवणींना मयुरीने वाट मोकळी करून दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरेने गेल्या 29 जुलै रोजी नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोष दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये होता आणि  डिप्रेशनमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले होते. आशुतोषच्या अकाली निधनाने मयुरीला जबर धक्का बसला होता. मयुरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय.

'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

11 ऑगस्टला आशुतोषचा वाढदिवस होता. या वाढदिवशी मयुरीने पतीच्या स्मरणार्थ एक भावूक पोस्ट लिहिली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियापासून लांब होती. पण आता पुन्हा एकदा मयुरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मयुरी म्हणते, हॅपी बर्थ डे श्वेता, माझ्याकडून आणि आशुकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आशु फार व्यक्त होत नव्हता. त्यामुळे तू त्याच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण होतीस, हे त्याने कधीच तुला सांगितले नसेल. विशेषत: गेल्या वर्षभरात तू आमच्यासाठी जे काही केलेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तू माझी बेस्ट फ्रेन्ड असूनही तू आशुला त्याच्या पद्धतीने समजून घेतलेस. कधीही जज न करता त्याच्यासाठी खूप काही केलेस. हा आमचा प्रवास होता, तसा तुझाही होता. डिप्रेशनला कसे समजून घ्यायचे. त्याला कसे सामोरे जायचे, हे सगळे आम्ही शिकत असताना तू सुद्धा या प्रवासात आमच्यासोबत होती. मला माहित नाहीस,तुझ्याशिवाय आम्ही अनेक टप्पे कसे पार केले असते. तू फक्त मागून मार्गदर्शन केले नाहीस तर आशुसोबत तू सुद्धा सगळे भोगले. तू मैत्री  निभवलीस. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आलीस. तुझ्यामुळे आमचा प्रवास  सुसह्य झाला. आपले प्रयत्न फसले, त्याचे दु:ख आमच्याइतकेच तुलाही आहे. आशु आज आपल्यासोबत नाही. पण कृपा करून तू हताश होऊ नकोस. कारण तुझ्यासारख्या व्यक्तिची जगात खूप गरज आहे. मला विश्वास आहे, आशु एक तारा बनून अवकाशात चमकत असेल. तुझ्यासारखी मैत्रिण मला मिळाल्याबद्दल आशुला खूप अभिमान होता आणि असेल. आनंदी राहा. खूप खूप प्रेम...

आशुतोष व मयुरी यांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती.  आशुतोष भाकरेने 29 जुलैला सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते.  मयुरीच्या या व्हिडिओने मात्र पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम केलं आहे. मयुरी या व्हिडीओमध्ये श्वेताला हताश न होण्याबद्दल समजावतेच पण या कठीण परिस्थितीतून तीही कशी सावरते आहे हेही दिसतं. यातून सावरायचं बळ मयुरीला मिळो याच एबीपी माझाच्या सदीच्छा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget