मयुरी देशमुखचं जोरदार कमबॅक, हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मयुरीच्या पतीने लॉकडाऊन काळात आत्महत्या केली. आशुतोष भाकरे या अभिनेत्याच्या आत्महत्येनं अवघा महाराष्ट्र हळहळला.
मुंबई : मयुरी देशमुख.. आपल्या अभिनयाने या अभिनेत्रीने सर्वांच्याच मनात घर केलं आहे. खुलता कळी खुलेना, प्लेझंट सरप्राईज, तिसरे बादशाह हम, डिअर आजो अशा अनेक मालिका नाटकांमधून मयुरी देशमुख प्रेक्षकासमोर आली. लोकांनीही तिला स्वीकारलं. सगळं आलबेल असताना ऐन लॉकडाऊनमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि पुन्हा एकदा मयुरी आणि तिचं कुटुंबं लोकांसमोर आलं. मयुरीच्या पतीने लॉकडाऊन काळात आत्महत्या केली. आशुतोष भाकरे या अभिनेत्याच्या आत्महत्येनं अवघा महाराष्ट्र हळहळला.
आशुतोष हा मयुरीचा पती. आशुतोषने उचललेलं हे पाऊल मयुरीला ही अनपेक्षित होतं. ही घटना घडल्यानंतर काही काळ मयुरी कुठेच काहीच चर्चेत नव्हती. मयुरी पुन्हा इंडस्ट्रीत येणार की नाही यावरही अनिश्तितता होती. अर्थात या गुणी अभिनेत्रीने पुन्हा एकदा उभारी घ्यावी असं प्रत्येकाला वाटत होतं. आता इतका काळ लोटल्यानंतर मात्र मयुरी काहीशी सावरली आहे. आणि आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आता मात्र तिने त्यासाठी माध्यम निवडलं आहे ते टीव्ही आणि भाषा आहे हिंदी.
मैत्रिणीला शुभेच्छा देताना मयुरी देशमुख झाली भावूक, व्हिडीओ शेअर!
मयुरी आता हिंदी मालिकेतून लोकांसमोर पुन्हा एकदा येणार आहे. या मालिकेचं नाव आहे इमली. ही मालिका एका गावात राहणाऱ्या युवकाभवती फिरणारी असून, त्याचं लग्न गावातल्या मुलीशी होतं आणि गावातली मुलगी शहरात येते. ती शहरात आल्यावर या मुलाला त्याची शहरातली मैत्रीण भेटते. अशा या त्रिकोणात इमली रंगणार आहे. विशेष बाब अशी की या मालिकेत मयुरीचा सहकलाकार असणार आहे तो गश्मीर महाजनी.
खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या
गश्मीर आणि मयुरी पहिल्यांदाच एकत्र काम करतायत. याबद्दल बोलताना मयुरी म्हणतेय, लॉकडाऊन काळात आशुतोषने घेतलेला निर्णय अनपेक्षित होता. आमचं दोघांचं नातं खूपच छान होतं. अचानक त्याने घेतलेल्या निर्णयाने बसलेला धक्का मोठा होता. या धक्क्यातून सावरायलाा मला काही काळ घ्यायचा होता. या काळात मला अनेक ऑफर्स आल्या. पण काम करावं असं मनापासून वाटत नव्हतं. पण कुठेतरी सुरुवात करायची त्यासाठी ही कथा आवडली आणि मी याला होकार दिला. किती दिवस आपण तरी दु;खात राहून कुटुंबालाही दु:खात ठेवायचं. शेवटी यातून बाहेर यायचा मी निर्णय घेतला. हे पाऊल उचलताना आशुतोषच्या आठवणी माझ्यासोबत असतीलच.