एक्स्प्लोर
Advertisement
कोरोनानंतर मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांचं काय? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय?
कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते नितीन वैद्य यांनी सहभाग घेतला.
मुंबई : कोरोनामुळं सर्वच क्षेत्रात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. यातून मनोरंजन क्षेत्र देखील सुटलेलं नाही. कोरोना काळात आणि कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते नितीन वैद्य यांनी सहभाग घेतला.
मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट- दिग्दर्शक महेश मांजरेकर
मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट, कोरोनावर लस येईपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही, असं मत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, लोकं थिएटरमध्ये येणार आहेत का? याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सध्या सर्व नियमांचं पालन करुन शूटिंग सुरु आहे. आपल्याला हिंदीकडून मोठं आव्हान आहे. साऊथला तसं नाही. मराठी माणसं मराठी सिनेमे पाहात नाहीत, तर मग आपण करायचं काय? असा सवाल मांजरेकर यांनी केला आहे. सिनेमा चालायचा असेल तर प्रेक्षक येणं गरजेचं आहे. लोकांची मानसिकता बाहेक पडून सिनेमा पाहण्याची तयार व्हायला खूप वेळ लागणार आहे. अभिनेत्यांनाही आता आपल्या मानधनाची किंमत कमी करणं गरजेचं आहे. कारण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हाती येतंय हे महत्वाचं आहे, असं मांजरेकर म्हणाले.
नाट्यनिर्मात्यांना काही सूट द्यावी- प्रशांत दामले
मनातील भीती दूर होणं गरजेचे आहे. नाटक सुरु करण्यासाठी आपल्याला संपूर्ण काळजी घ्यावी लागणार. नाट्यगृह सॅनिटाईज करणं, स्वच्छता राखणं या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. नाटकांची गणितं वेगळी, जोवर हे सगळं व्यवस्थित होत नाही तोवर नाटकं सुरु होणं कठिण आहे, असं अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे. पुढच्या जूनपर्यंत नाटकांचं गणित रुळावर येणं कठिण आहे. नाटकाला जगवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं प्रशांत दामले म्हणाले. कलाकारांनी मानधन घेताना किंवा जाहिरातदारांनी आपल्या किमतींबाबत विचार करावा, असं देखील ते म्हणाले. तसेच नाट्यगृहांसाठी देखील महापालिका किंवा त्याच्या मालकांनी सूट द्यावी, असं ते म्हणाले. हजारच्या जागी तीनशे ते चारशेच लोकं नाट्यगृहात बसू शकतील, त्यामुळं काही सूट द्यायला हवी, असं प्रशांत दामले म्हणाले.
मालिकांसाठी वेबसिरीज हे आव्हान नाहीच - नितीन वैद्य
यावेळी बोलताना निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर मालिकांचं शूटिंग सुरु आहे. 85 मालिकांचं शूटिंग सुरु आहे. जवळपास 10 हजार लोकांना काम मिळालं. आपलं कुटुंब मानून सर्व काळजी घेत काम सुरु आहे. यामुळं अर्थकारण देखील सुरु झालं आहे, असं निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितलं आहे. अर्थकारणावर नक्की परिणाम झाला. जाहिरातींचं बजट शून्यावर गेलेलं. 33 टक्के कामगार आणि कलाकारांचं वेतन कपात झालं नाही तर उरलेल्या लोकांना देखील जवळपास सर्व निर्मात्यांनी काही ना काही रक्कम वेतन म्हणून दिली, असं वैद्य म्हणाले. आता नव्याने शूटिंग सुरु करताना सर्व निर्मात्यांनी आणि वाहिन्यांनी सर्व कलाकार तसेच सहकाऱ्यांचे विमे उतरवले आहेत. मराठी मालिकांचे प्रेक्षक कमी झालेले नाहीत, खूप कमी लोकच वेब सिरीज पाहतात, म्हणून मालिकांसाठी वेबसिरीज हे आव्हान नाहीच, निर्माते नितीन वैद्य यांचं मत . टिव्ही मालिकांच्या भागांची संख्या भविष्यात कमी करावी लागेल. चांगल्या कथा, कन्सेप्ट आणाव्या लागतील. कारण प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. आणि तसे बदल मालिकांमध्ये होत आहेत. दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावू शकतं हे जाहिरातदारांना देखील कळलंय. मात्र मालिकांनी लांबी कमी करणं गरजेचं आहे, त्याकडे आता मालिका विश्व गांभीर्याने पाहात आहे, असं देखील नितीन वैद्य म्हणाले.
हे ही वाचा
कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात
राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही वेळ नाही : राज ठाकरे
राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस
कोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई
Majha Maharashtra Majha Vision | हे लिव्ह-इन रिलेशनशिप आहे, कुटुंब वगैरे नाही, त्यामुळे हे सरकार टिकेल असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
Majha Maharashtra Majha Vision 2020 | आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement