एक्स्प्लोर
राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही वेळ नाही : राज ठाकरे
राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण कोरोनाचं संकट असताना ही योग्य वेळ नाही, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही योग्य वेळ नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच राम मंदिराचं ई-भूमिपूजन मान्य नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला सर्व धर्मीय लोक उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही. Majha Maharashtra Majha Vision 2020 | शटडाऊन, लॉकडाऊन नको; आता सगळं सुरु करा : राज ठाकरे Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे धूमधडाक्यातच भूमिपूजन व्हावं याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "राम मंदिर निश्चित झालं पाहिजे. ही माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी असंख्य कारसेवकांनी प्राणांची आहुती दिली. राम मंदिराचं भूमिपूजन असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं, पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भूमिपूजन आहे, एक दिवसाची बातमी होती. पण लोक त्या मानसिकतेत नाही. झालं तर आनंद आहे, ते मंदिर उभं राहिल तेव्हा जास्त आनंद होईल. पण आताच्या वेळी हे भूमिपूजन का ठेवलं हा प्रश्न आहे. राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यात व्हायला हवं. दोन महिन्यांनी झालं तरी चालेल. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर झालं तरी चालेल. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे ई-भूमिपूजन नको, त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं." Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही माझा महाराष्ट्र माझं व्हिजन विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं. Majha Maharashtra Majha Vision | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार नाही - राज ठाकरे
आणखी वाचा























