एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2020 | आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार : राजेश टोपे

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, टेस्टिंग, आरोग्य विभागातील भरती आणि अनलॉकबाबत मत व्यक्त केलं.

मुंबई : "आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष व्हायचंच. पण आता सगळ्या रिक्त जागा भरणार आहे. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या जागा भरणार आहेत. तसंच जिथे गरज आहे तिथे रुग्णालयं वाढवणार आहे," असा निर्धार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 70 लाख टेस्टिंग केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. पाचव्या सत्रात राजेश टोपे यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.

कोरोनाला घाबरायचं नाही "लस येत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. बऱ्यापैकी नियंत्रण आणलेलं आहे. सगळ्यात जमेची बाब म्हणजे अडीच लाखांपेक्षा रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. मुंबईत सध्या 25 ते 30 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा डबलिंग रेट 30 दिवसांचा आहे. मृत्यूदर साडेतीन टक्क्यांवर आहे. तर 60 टक्क्यांवर रिकव्हरी रेट आहे. कोरोनाबाबत सतर्कता ठेवायची आहे, जागरुकता ठेवायची आहे परंतु घाबरायचं नाही. कोरोनातून बरे होतोच," असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

सामान्य रुग्णाला डोळ्यासमोर ठेवून सरकार धोरण राबवत आहे. खासगी रुग्णालय ताब्यात घेतले, जम्बो हॉस्पिटल बांधले. अॅम्ब्युल्स  घेतल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सेवा देत आहोत, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

राजेश टोपे म्हणाले की, "कोरोनासोबत जगत असताना नागरिकांनी एसएमएस म्हणजेच (सोशल डिस्टन्सिंग+मास्क+सॅनिटायझर) हे धोरण अवलंबलं पाहिजे. यासाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे. कोरोनाला न घाबरता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी. यासाठी उत्तम आहार, व्यायाम महत्त्वाचा आहे. रक्तातली साखर मर्यादित ठेवावी लागेल."

लॉकडाऊन उठवायचा आहेच, पण टप्प्याटप्प्याने "लॉकडाऊन संपवा आणि सगळं सुरु करा," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'च्या पहिल्या सत्रात व्यक्त केलं. त्याविषयी विचारलं असता राजेश टोपे म्हणाले की, "राज ठाकरे यांचं म्हणणं काही अंशी योग्य आहे.  पण लॉकडाऊन पूर्णपणे उठलं तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. लॉकडाऊन उठवायचा आहेच, पण टप्प्याटप्प्याने. अनलॉकिंगसाठी थम्बरुल आहे. मुंबईत लॉकडाऊन विषय राहणार नाही, अनलॉकचाच राहिल."

मुंबईकडे लक्ष दिलं याचा अर्थ इतर जिल्ह्यांकडे दुर्लक्ष केलं असं नाही राज्य सरकारने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईकडे अधिक लक्ष दिलं, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात केला. त्याबाबत राजेश टोपे म्हणाले की, "मुंबईत छोटी घटना घडली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची प्रतिक्रिया उमटते.भारताच्या इमेजचा प्रश्न मुंबईशी निगडित आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईकडे लक्ष देणं साहजिकच महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ इतर भागांमध्ये दुर्लक्ष केलं, असा होत नाही. पुण्याकडे तेवढं लक्ष दिलं जात आहे. नाशिक, नागपूर औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही शहराला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. सगळीकडे लक्ष देत आहोत. मुंबई हे नाक आहे. मुंबईतं नियंत्रण मिळवलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळतो." आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार आरोग्यावरील खर्च वाढवणार आहे. याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार आहे. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या जागा भरणार आहेत. तसंच जिथे गरज आहे तिथे रुग्णालयं वाढवणार आहे. स्वच्छता, नम्रता आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर आमचं विभाग काम करेल. उच्चभ्रूंनी इथे उपचार घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, अशा दर्जाची सरकारी रुग्णालयं बनवणार आहे." माझा व्हिजनमधील प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.

याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

Majha Maharashtra Majha Vision | Rajesh Tope Vision | आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget