एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision | माझा रोल बदलला असला तरिही, महाराष्ट्रासाठी माझं व्हिजन तेच आहे : देवेंद्र फडणवीस

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'मुख्यमंत्री असताना जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन माझं आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तिच आहेत. त्यामुळे ज्या रोलमध्ये असेल त्या रोलमध्ये जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत राहणार आहे.' एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. पहिल्या सत्रात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपलं व्हिजन मांडताना म्हणाले की, 'देशातील आज सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक 42 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट सुधारत असला तरिही, देशातील पहिल्या अकरा राज्य ज्या राज्यांचा रिकव्हरी रेट चांगला आहे, अशी 11 राज्यांची यादी आयसीएमआरने जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. आज देशातील प्रमुख राज्यांचा संक्रमणाचा दर हा 5 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत आहे. पण, महाराष्ट्राचा 20 टक्क्याच्याही वर आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होत आहेत.' पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'सध्या कोरोना संक्रमणाच्या उच्चांकाची लाट आपल्याला एमएमआर रिजनमध्ये, पुण्यात, नाशिकच्या काही भागांत आपल्याला दिसत आहे. तसेच ग्रामीण भागांपर्यंतही कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. या महामारीशी लढाई लढून आपल्या लोकांना बाहेर आणवचं लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणं आणि टेस्टिंग झाल्यानंतर आयसोलेशनची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर उभी करणं, यामुळे आपण महामारीतून बाहेर येऊ शकू. यासंदर्भातलं एक उत्तम उदाहरण आपल्याला दिल्लीचं पाहायला मिळेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नाने दिल्लीला महामारीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. अर्थात अजूनही दिल्ली पूर्णपणे बाहेर आलेलं नाही, पण दररोज वाढणाऱ्या आकड्यात घट आली आहे.'

'महाराष्ट्रात आसीएमआरने, निती आयोगाने जे मुंबईत टेस्टिंग केलं त्यामध्ये असं दिसून आलं की, लोकांच्या शरीरात अँटीबॉडिजचं प्रमाण वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यामध्ये सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोरोना काळात जसं जगण्याचं संकट आहे, तसचं अस्तित्वाचं संकटही आहे. समाजातील बारा बलुतेदार, शेतमजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार यांसारख्या लोकांवर आता जण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढाई लढत असताना आपण लॉकडाऊन की, अनलॉक या वादात न राहता, आता अनलॉकच.' असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाशी लढा, अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणं गरजेचं : देवेंद्र फडणवीस 

लॉकडाऊननंतरचं अर्थतंत्र पुर्वपदावर कसं आणता येईल यावर आपलं व्हिजन मांडताना ते म्हणाले की, 'अनलॉक करत असताना त्यात योग्य ती काळजी घेत, पण थोड्या बोल्ड स्टेप्स घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. प्रत्येक सेक्टरचा विचार करून, त्या सेक्टरच्या अडचणी समजून, योग्य ती काळजी घेत ते सेक्टर कसं ओपन करता येईल? असा डेडिकेटेड विचार सध्याच्या सरकारमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, एक उच्चपदस्थ व्यवस्था निर्माण करून, त्या व्यवस्थेच्या मदतीने अर्थव्यवस्थेच्या तिनही क्षेत्रांमध्ये कोणत्या पद्धतीने काम सुरु करता येईल याचाही विचार येत्या काळात करणं गरजेचं आहे.'

'संपूर्ण जगभरात उद्भवलेल्या महामारीमुळे हे खरं आहे की, काही प्रश्न राज्यसरकारसमोरही आहेत. विशेषतः आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु, याकाळात केंद्र सरकारनेही मोठ्या प्रमाणात राज्याला मदत केली आहे. जीएसटीचे 19 हजार 200 कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत. आत्मनिर्भर पॅकेजमधून जवळपास 28 हजार कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आता हातपाय गाळून चालणार नाही, थोडी हिंमत दाखवावी लागणार आहे. काही पावलं उचलावी लागती. त्यातून अर्थव्यवस्था उभी राहू शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला कोरोना संदर्भातील व्हिजन आहेच. पण आपण आशावादी राहून कोरोना संपणार आणि पुन्हा अर्थव्यवस्थेला उभं करायचं आहे. या दृष्टीने तयारी केली नाही, तर उद्या सेवा क्षेत्रावर, उद्योगांवर जो काही परिणाम होणार आहे. त्यातून बाहेर पडणं अत्यंत अडचणीचं होणार आहे.', असं फडणवीस म्हणाले.

'माननिय मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांच्या कमिटी तयार केल्या होत्या. त्यातील तज्ज्ञांचे अहवाल येऊन पडले आहेत, आता या अहवालांवर कारवाई होणं गरेजचं आहे. जर कारवाई झालीच नाही तर अहवालांचा फायदा काय, विशेषतः शेती क्षेत्रात, खरीपाचा रब्बीचा माल आपण खरेदी करू शकलो नाही. शेतकऱ्यांना युरीया खतं मिळू शकली नाहीत. त्यावरून सांगतो की, यंदा आपल्या धरणांतील पाणीसाठी आणि एकूण पावसाची परिस्थिती पाहता त्यामुळे शेती क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच व्यवस्थापनाची गरज असून त्यामुळे शेती क्षेत्र स्थिरावू शकतं. तसेच कोरोनाच्या संकटामुळे शहरातून ग्रामीण भागांत जी लोकं गेली आहेत. त्यांनाही रोजगार मिळू शकतो.', असं म्हणत त्यांनी शेती क्षेत्राबाबतचं आपलं व्हिजन स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.

याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget