Money Heist प्रमाणेच अॅक्शन, ड्रामा आणि थ्रीलची मेजवानी; नेटफ्लिक्सवरच्या 'या' धमाकेदार वेब सीरिज
Web Series On Netflix : मनी हाईस्ट प्रमाणेच अॅक्शन,ड्रामा आणि थ्रील असणाऱ्या वेब सीरिज कोणत्या ते पाहूयात-
Web Series On Netflix : सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. नेटफ्लिक्सवरील (Netflix) मनी हाईस्ट या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ही सीरिज लॉकडाउनमध्ये अनेक लोक बिंच वॉच करत होते. आता मनी हाईस्ट प्रमाणेच अॅक्शन,ड्रामा आणि थ्रील असणाऱ्या वेब सीरिज कोणत्या ते पाहूयात-
STRANGER THINGS (2016) : मिल्ली बॉबी ब्राउन (Millie Bobby Brown) आणि त्यांच्या टीमची 'स्ट्रेंजर थिंग्स' या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या जॉयस, नॅन्सी, डस्टिन, मॅक्स आणि माइक यांच्या संपूर्ण टीमची कथा दाखवण्यात आली आहे.
SACRED GAMES (2018-2019) : 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या वेब सीरिजचे दोन पार्ट प्रदर्शित करण्यात आले. नवाजुद्दीन सिद्दिकी, सुरवीन चावला, कल्की कोचलीन, रणवीर शोरी आणि सैफ अली खान या कलाकारांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. दुसऱ्या सीझनचे अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शिक केला आहे.
SQUID GAME : मनी हाईस्टनंतर सर्वांत चर्चेत असणारी वेब सीरिज म्हणजे 'स्क्विड गेम'. ब्लूमबर्गमधील इंटरनल रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजने आत्ता पर्यंतचे सर्व रेकोर्ड्स तोडले असून 900 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ही वेब सीरिज तयार करण्यासाठी फक्त 21.4 मिलियन डॉलर एवढा खर्च झाला होता. 'स्क्विड गेम' या साउथ कोरियन वेब सीरिजला अनेकांनी पसंती दिली आहे. या सीरिजला ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) यांनी दिग्दर्शित केला आहे.
संबंधित बातम्या
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...
Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?