(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे.
Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अमृताची लावणी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडली. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता अमृता खानविलकर हिने चाहत्यांना आणी प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्राच्या कलेला बदनाम करू नका, असे आवाहन केले आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) म्हणाली की, ट्रोल केल्याने केवळ व्ह्यूज मिळतात म्हणून लावणीला ट्रोल करू नका. लावणीही शृंगारिक आहे, हे खरं..मात्र, ती स्पिरिच्युअलसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे, तिला बगालबोट लावू नका, असं जाहीर आवाहन तिने केले आहे. लावणीचा कार्यक्रम ठेवला म्हणून वैद्यनाथ गणेशोत्सवावर काही टीका झाली होती. त्याचा दाखला देत अमृता यावेळी म्हणाली की, लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. तिला अशा खालच्या नजरेतून बघणे पाप आहे.
नाथ प्रतिष्ठानला बदनाम करू नका : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीच्या नाथ प्रतिष्ठान मागच्या सतरा वर्षापासून वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. याही वर्षी या गणेशोत्सवामध्ये लावणी.. कव्वाली..भीम गीते आणि हास्य कार्यक्रमांचे मोठे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमावर जोरदार टीकादेखील झाली होतो. यावेळी धनंजय मुंडे यांनी हात जोडून विनंती करतो पण नाथ प्रतिष्ठानला बदनाम करू नका अशी विनंती केली आहे. वैद्यनाथ गणेशोत्सवामध्ये अजय अतुल यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने धनंजय मुंडे व्यासपीठावरून बोलत होते.
‘चंद्रमुखी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती 'चंद्रा' हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावले. तिची आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच 'चंद्रा'च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे, चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार, हे सगळं आता प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर पार पडणार आहे.
संबंधित बातम्या