KGF Chapter 2: रिलीज होण्याआधीच केजीएफ-2नं मोडला आरआरआरचा रेकॉर्ड; प्री-बुकिंगमधून केली कोट्यवधींची कमाई
यशचे (Yash) चाहते 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
KGF Chapter 2 : दक्षिणात्य चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यशचा (Yash) 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. यशचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या आठवड्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. केजीएफचा हिंदी व्हर्जन देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची तुलना आरआरआर या चित्रपटासोबत केली जात आहे. या चित्रपटानं आरआरआर चित्रपटाचं रेकॉर्ड मोडला आहे. आरआरआर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं अॅडव्हान्स बुकिंगमधून पाच कोटींची कमाई केली होती. उत्तर भारतातील सर्व भाषांमध्ये केजीएफ-2नं 20 कोटींची कमाई केला आहे.
रिपोर्टनुसार, केजीएफ चॅप्टर 2 अॅडव्हान्स बुकिंगद्वारा 20 कोटींची कमाई केली आहे. कन्नड व्हर्जननं 4.90 कोटी, हिंदी व्हर्जननं 11.40 कोटी, मल्याळम व्हर्जननं 1.90 कोटी, तेलुगू व्हर्जननं 5 लाख, तमिळ व्हर्जननं 2 कोटींची कमाई केली आहे.
#Xclusiv... 'KGF 2' 6 AM SHOWS & MORE...
— taran adarsh (@taran_adarsh) April 9, 2022
🔥 #KGF2 advance booking PHENOMENAL
🔥 Morning shows to start as early as 6 am in #Mumbai and #Pune
🔥 Ticket prices at *select locations*: ₹ 1450 / ₹ 1500 per seat [#Mumbai] and ₹ 1800 / ₹ 2000 per seat [#Delhi]#Toofan is arriving! pic.twitter.com/wnv5aaZQ1j
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, KGF चॅप्टर 2 चा पहिला शो सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. KGF Chapter 2 चा शो मुंबई आणि पुण्यात सकाळी 6 वाजता सुरू होईल.
KGF Chapter 2 चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली.
हेही वाचा :
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...
- Samrenu : ‘सम्या’ ‘रेणू’नंतर ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला, 'समरेणू'च्या पोस्टरचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अनावरण!
- KGF Chapter 2 : आमचे चित्रपट साऊथमध्ये चालत नाहीत म्हणणाऱ्या सलमानला यशने दिलं उत्तर! म्हणाला, ‘कधी कधी तर...’