KGF Chapter 2 : आमचे चित्रपट साऊथमध्ये चालत नाहीत म्हणणाऱ्या सलमानला यशने दिलं उत्तर! म्हणाला, ‘कधी कधी तर...’
KGF Chapter 2 : यशने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खानच्या (Salman Khan) 'आमचे चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत?' या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
KGF Chapter 2 : साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. 'पुष्पा: द राइज' (Pushpa The Rise) आणि 'आरआरआर' नंतर (RRR) आता 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. यावेळी यशसोबत संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tondon) आणि प्रकाश राजसारखे (Prakash raj) दमदार स्टार्स या चित्रपटात दिसणार आहेत. यश, रवीना टंडन आणि संजय दत्तसोबत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच यशने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खानच्या (Salman Khan) 'आमचे चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत?' या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन करताना सलमान खानने विचारले होते की, बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत? सलमान खानचा हा प्रश्न यशला त्याच्या नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला होता, ज्याचे उत्तर देताना अभिनेत्याने असे काहीही नसल्याचे सांगितले. काही वेळा आमच्या चित्रपटांनाही यश मिळत नाही, असे तो म्हणाला.
ही सगळी डबिंगची जादू!
सलमान खानच्या या प्रश्नाला उत्तर देताना यश म्हणाला, 'असं अजिबात नाही. आमच्या चित्रपटांनाही याआधी असा प्रतिसाद मिळाला नव्हता, पण आता डब व्हर्जन बनवायला सुरुवात झाली आहे. लोकांना आता आमच्याद्वारे तयार केले गेलेले चित्रपट माहित आहे. मला वाटते की, सुरुवातीच्या काळात लोक डबिंगला गंमत म्हणून घेत असत. कारण, आता ज्या प्रकारची डबिंग होत आहे, ती लोकांना आवडत आहे. हे एका रात्रीत घडले नाही.'
यानंतर यशने 'बाहुबली' चित्रपटाचे सर्व श्रेय दिले आणि सांगितले की, 'पहिली काही वर्षे अशीच होती, नंतर हळूहळू लोकांना कंटेंट, एक्सप्रेशन आणि इतर सर्व काही समजू लागले. एसएस राजामौली सर आणि प्रभासच्या 'बाहुबली'शी थेट कनेक्ट होण्याचा मार्ग आम्हाला सापडला. यानंतर 'केजीएफ'ला व्यावसायिक अँगल दिला. माझ्या दिग्दर्शकाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला वाटलं की, हा चित्रपट संपूर्ण भारतात धमाका करू शकतो. माझे निर्मातेही त्यात सामील झाले. आम्ही मेहनत केली आणि लोकांनी त्याचे फळ दिले.’
आम्ही हिंदी चित्रपट पाहतो!
पुढे हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना यश म्हणाला, 'मी अनेक हिंदी चित्रपट पाहिले आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. सलमान सर म्हणतायत ते बरोबर आहे, पण आपल्याला दिसत तसं अजिबात नाही. आपण त्यातील त्यांनी इतर पैलूंकडेही लक्ष द्यायला हवे.’ यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2018मध्ये आला होता, ज्यामध्ये यशने ‘रॉकी भाई’ची भूमिका केली होती. त्याचबरोबर आता चित्रपटाची कथा दुसऱ्या भागात पुढे नेली जाणार आहे.
हेही वाचा :
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...
- Samrenu : ‘सम्या’ ‘रेणू’नंतर ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला, 'समरेणू'च्या पोस्टरचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अनावरण!
- Runway 34 Trailer : लोकांचा जीव वाचवणारा कॅप्टन विक्रम कसा ठरला दोषी? ‘रनवे 34’मधून अजय देवगण सांगणार थरारक कथा!