Kangana Ranaut Viral Speech : 'तेजस्वी' नावाने कंगनाचा घोळ, भाषणात स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात थयथयाट; म्हणाली, 'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात'
Kangana Ranaut Viral Speech : अभिनेत्री कंगना रणौत हीने नुकत्याच झालेल्या तिच्या भाषणात तिच्याच पक्षाच्या नेत्याचा उल्लेख करत टीका केल्याचं पाहायला मिळालं.
Kangana Ranaut Viral Speech : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सध्या तिच्या लोकसभा मतदारसंघामध्ये (Lok Sabha Election 2024) जोरदार प्रचार करतेय. तिच्या सभा, रॅली, भाषणं याने ही मंडीमधील जनेतेची मनं जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करतेय. कंगना तिच्या भाषणातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आहे. पण नुकतच तिने केलेल्या भाषणातून तिने चुकून तिच्याच पक्षाच्या नेत्यावर टीका केली आहे.
कंगना मंडीमधील सरकाघाट विधानसभा मतदारसंघात प्रचार करत होती. त्यावेळी तिने तिच्या भाषणात तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. पण तिने यावेळी नाव मात्र तिच्या पक्षातील नेत्याचं घेतलं. कंगनाने चुकून तेजस्वी यादव ऐवजी तेजस्वी सुर्या असा उल्लेख केला. दरम्यान तेजस्वी सूर्या मासे खात असल्याचा उल्लेख कंगनाने केला आहे. तेजस्वी सूर्या हे भाजपचे नेते असून ते कर्नाटकमधून लोकसभेचे खासदार आहेत.
कंगनाने काय म्हटलं?
कंगनाने तिच्या भाषणादरम्यान म्हटलं की, त्यांनाच नाही माहित ते कुठे जातात आणि कुठे येतात. हा बिघडलेल्या शहजाद्यांचा एक पक्ष आहे. मग ज्यांना चंद्रावर बटाट्याचं पिक घ्यायचं आहे, ते राहुल गांधी असो किंवा जे गुंडगिरी करतात ते तेजस्वी सूर्या असो. ते तर मासे दाखवून दाखवून खातात, असंही कंगनाने म्हटलं आहे.
कंगनाकडून स्वत:च्याच पक्षाच्या नेत्यावर टीका
दरम्यान काही दिवसांपूर्वी जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारदरम्यान मासे खातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यातच चैत्र नवरात्रीच्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळेच या गोष्टीचा उल्लेख करताना कंगनाने चुकून तेजस्वी यादव यांच्याजागी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं.
Watch: BJP candidate from Mandi Kangana Ranaut says, "Those who do not understand the language of this country and those who understand its culture, how can they run this country" pic.twitter.com/Ub13jkxUST
— IANS (@ians_india) May 4, 2024