एक्स्प्लोर

'हा तर सांस्कृतिक दहशतवाद'; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांचा संताप तर भाजप म्हणतंय...

किरण माने (Kiran Mane) प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) संताप व्यक्त केला तर राम कदम (Ram Kadam) यांनी महाविकास आघाडी वर टिका केली आहे.

Kiran Mane,Jitendra Awhad, Ram Kadam :  अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. राजकिय भूमिका सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे किरण यांना या मालिकेतून काढण्यात आलं, असं म्हणटलं जात आहे. अनेक लोक किरण माने यांना पाठिंबा दर्शवत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. या प्रकरणाबद्दल आता राजकिय नेत्यांनी देखील त्यांची मतं व्यक्त केली आहे. 

किरण माने यांना पाठिंबा दर्शवत जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'हा तर सांस्कृतिक दहशतवाद आहे.कोणतीही कला असो, तिच्यावर निर्बंध आले की , समाजाची निकोप सांस्कृतिक वाढ होत नाही. राज्यसत्ता,धर्म, धर्ममार्तंड,यांनी आपल्याला त्रासदायक असणाऱ्या अभिव्यकतीना चेपून टाकले, हे वेगळ्याने सांगायला नको.युरोप इंग्लंड पासून पार भारत देशात हे वागणे नवे नाही.मग तो विषाचा प्याला पिणारा सॉक्रेटिस असो अथवा आयुष्यभर अपमानाचे जिणे पेलणारे ज्ञानेश्वर असोत.सांस्कृतिक दडपशाही नवी नाही.तालिबानी विचारांना आपण हसतो पण त्यासारखे वागणे आपल्या देशात घडतेय याबद्दल सोयीस्कर मौन बाळगले जाते.आता यापुढे अजून  एक प्रकार घडलाय.विद्यमान सरकारच्या धोरणावर नाराजी ,टीका केली म्हणून किरण माने या कलावंताला स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकले.कलावंताला कामावरून कमी करणे हे चित्रपट , किंवा नाट्यक्षेत्रात तसे नवे नाही पण किरण माने यांना ज्याप्रकारे काढले गेले ते अतिशय निषेधार्ह आहेत. कोणताही विरोधी विचार आम्ही ऐकून घेणार नाही, ही हुकूमशहा मनोवृत्ती यातून दिसते. स्टार वाहिनीवर किंवा त्या मालिकेच्या निर्मात्यावर, कोणता दबाव आणला गेला, की पुढील घटना वाईट होतील, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले, याची कल्पना नाही. '  किरण माने यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे..उद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गरजेचे आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांचं महाविकास आघाडी वर टिकास्त्र
भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महाविकास आघाडी वर टिका केली आहे. त्यांनी याबाबत सांगितले, 'हिंदू आतंकवाद या शब्दाला जन्म देऊन कोट्यावधी हिंदूंचा अपमान करणारे आता सांस्कृतिक दहशतवाद या शब्दाला जन्म देऊन या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्यांचा आपमान करत आहेत. कपिल शर्मा, शाहरुख खान, जावेद अख्तर, नसरुद्दीन शहा यांच्यापासून अनेकांनी केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली पण कोणाचा चित्रपट गेला? वसुलीच्या खेळात स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी आणि अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या गोष्टीचा आधार घ्यावा लागत आहे.'

संबंधित बातम्या

Kiran Mane : राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं!सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Deepika Padukone : ...अनुष्काप्रमाणेच दीपिकाही झाली असती एका क्रिकेटपटूची पत्नी; लव्ह स्टोरी माहितीये?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget