Deepika Padukone : ...अनुष्काप्रमाणेच दीपिकाही झाली असती एका क्रिकेटपटूची पत्नी; लव्ह स्टोरी माहितीये?
दीपिका आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) ही जोडी नेहमी चर्चेत असते.

Deepika Padukone Affair with Yuvraj Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. 'बाजीराव मस्तानी' असो वा 'पद्मावत' दीपिकाच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. दीपिका आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) ही जोडी नेहमी चर्चेत असते. या दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. पण त्याआधी दीपिकाचे नाव क्रिकेटर युवराज सिंहसोबत (Yuvraj Singh)जोडले जात होती. जाणून घेऊयात त्यांच्या रिलेशनबाबत...
रिपोर्टनुसार, युवराज आणि दीपिका यांची पहिली भेट टी 20 वर्ल्ड कप दरम्यान झाली. तेव्हा दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक कार्यक्रमांमध्ये दीपिका आणि युवराजने एकत्र हजेरी लावली. असं म्हणलं जातं होतं की, दीपिका आणि युवराज हे सिक्रेट डेटवर देखील जात होते. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. एका मुलाखतीमध्ये युवराजने सांगितले होते, 'मी साऊथ आफ्रिकेतून परत येत होते तेव्हा एका मित्राने माझी ओळख दीपिकासोबत करून दिली. आम्ही दोघे एकमेकांबद्दल जाणून घेत होतो.'
View this post on Instagram
दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 83 चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























