Kiran Mane : राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं!सोशल मीडियावर चाहते आक्रमक
मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेतून किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं आहे.
Kiran Mane : छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका देखील सोशल मीडियावर मांडत आहेत. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.
एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट शेअर करत या गोष्टीचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. '
किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. #IStandWithKiranMane pic.twitter.com/PE7Jn28si0
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2022
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी देखील ट्वीट शेअर करत निषेद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.'
स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
संबंधित बातम्या
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha