एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 18 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 18 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'च्या शूटिंगला पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात

Mirzapur 3 Shooting Date : लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या (Mirzapur-3)तिसऱ्या सीझनची नवी माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीरिजचा तिसरा सीझन आणखी दमदार असणार आहे. या सीझनमध्येही कालिन भैया आणि गुड्डू भैय्या आपली अभिनयाची जादू दाखवतील यात शंका नाही.  'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal) आणि श्वेता त्रिपाठी (Shewta Tripathi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या स्थानिक ऑडिशन्स उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये पूर्ण झाल्या आहेत.

शनिवारी लखनौमध्ये मिर्झापूर 3 च्या स्थानिक कलाकारांच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या. ऑगस्टच्या अखेरीस लखनौ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मिर्झापूर 3 च्या ऑडिशन्स 15 आणि 16 जुलै रोजी गोमतीनगरमध्ये घेण्यात आल्या.

अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या सीनचे चित्रीकरण लखनौमध्ये होणार आहे. यासाठी जुन्या लखनौमधील चौक, इमामबारा, रूमी दरवाजा, काकोरी, मलिहाबादसह आसपासची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वेब सिरीजचे शेड्युल जवळपास एक महिन्याचे असून, त्यात स्थानिक कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

‘मिर्झापूर 3’चे लोकल लाईन प्रोड्युसर रती शंकर त्रिपाठी आहेत. 'मिर्झापूर 2' चा काही भाग लखनौमध्ये शूट करण्यात आला होता. 'मिर्झापूर 3'चे शूटिंग सुरू झाले आहे.

17:22 PM (IST)  •  18 Jul 2022

Vineet Kumar Singh : रंगबाज 3 साठी विनीत कुमार सिंहचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

Vineet Kumar Singh : अभिनेता विनीत कुमार सिंहने (Vineet Kumar Singh) मनोरंजन क्षेत्रात आपली अष्टपैलुत्व अनेकदा सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज'मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली. यात बेतालचा लष्करी अधिकारी आणि गुंजन सक्सेनाच्या लष्करी दलातील पायलट भूमिकेचाही समावेश आहे. आता तो आणखी एका दमदार व्यक्तिरेखेसह लोकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.

वाचा सविस्तर बातमी

16:33 PM (IST)  •  18 Jul 2022

21 वर्षाच्या मॉडेलनं संपवलं आयुष्य; राहत्या घरात आढळला मृतदेह

Kolkata Model Puja Sarkar Suicide : कोलकाता  (Kolkata) चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे.  मे महिन्यामध्ये जवळपास चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. आता दक्षिण कोलकाता (Kolkata) येथील बांसद्रोणी भागामध्ये राहणाऱ्या पूजा सरकार (Puja Sarkar) नावाच्या मॉडेलनं आत्महत्या केली आहे. 

15:01 PM (IST)  •  18 Jul 2022

Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई

Hit-The First Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  राजकुमार रावचा (Rajkummar Rao)  हिट-द फर्स्ट (Hit-The First Case) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे. तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं. 

14:28 PM (IST)  •  18 Jul 2022

Mere Desh Ki Dharti : ओटीटीवर पाहा 'मेरे देश की धरती' चित्रपट; दिव्येंदु शर्माची प्रमुख भूमिका

Mere Desh Ki Dharti : सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ओटीटीवरील चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.  चित्रपटांच्या या रंजक प्रवासात प्रेक्षकांची आणि समीक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवणारा दिव्येंदु शर्माचा (Divyendu Sharma) ‘मेरे देश की धरती’ (Mere Desh Ki Dharti) हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर पहाता येणार आहे. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता या चित्रपटाचा आस्वाद ‘अॅमेझॉन प्राइम’ (Amazon Prime) वर घेता येईल. नुकताच हा चित्रपट अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ आला आहे. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर बातमी 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget