Firecracker Song: 'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित; 'फायरक्रॅकर'मध्ये रणवीरचा हटके अंदाज
जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटामधील 'फायरक्रॅकर'(Firecracker) हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.
![Firecracker Song: 'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित; 'फायरक्रॅकर'मध्ये रणवीरचा हटके अंदाज jayeshbhai jordaar song firecracker release ranveer singh desi dance Firecracker Song: 'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित; 'फायरक्रॅकर'मध्ये रणवीरचा हटके अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/ddd3c17c80c3251eaf22956167be72b3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Firecracker Song : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'फायरक्रॅकर'(Firecracker) हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामधील रणवीरच्या हटके अंदाजानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
'फायरक्रॅकर' हे गाणं विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी गायले आहे तर कुमार आणि वायु यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्यामधील रणवीर सिंहच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2 मिनीट 38 सेकंदाचे हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
जयेशभाई जोरदार या चित्रपटामध्ये रणबीरनं जयेशभाई ही भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी यांनी एका गावाच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जयेशभाई जोरदार हा चित्रपट 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांक ठक्कर यांनी केलं आहे. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच पूर्ण झाले. पण कोरोना महामारीमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून असे लक्षात येते की चित्रपटामध्ये स्त्री भ्रूण हत्या हा मुद्दा मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)