Jaat Box Office Collection Day 13: 'जाट'नं दिग्गजांना झुकवलं, बॉक्स ऑफिस गाजवलं; सनी देओलच्या करिअरची सर्वाधिक कमाई करणारी दुसरी फिल्म
Jaat Box Office Collection Day 13: सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं खूप कमाई केली आहे. 'जाट'नं 'गदर'चा विक्रम मोडला आहे.

Jaat Box Office Collection Day 13: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat Movie) हा चित्रपट चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांची सनी देओलचा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे. या चित्रपटात जेवढं सनी देओलचं कौतुक होत आहे, तेवढंच कौतुक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचंही होत आहे. हा अॅक्शन चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. 'जाट' चित्रपटानं आता गदरचा विक्रमही मोडला आहे. यासह, सनी देओलचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. अशातच 'जाट'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
View this post on Instagram
'जाट' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'जाट' चित्रपटानं तेराव्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी 2 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाचं एकूण कलेक्शन 78.25 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तेराव्या दिवशी 'जाट'च्या अधिकृत कलेक्शनचे समोर आलेले आकडे अद्याप अधिकृत नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतो. जर चित्रपटानं 78.25 कोटी रुपये कमावले असतील तर याचाच अर्थ 'जाट'नं 'गदर'चा लाईफटाईम कलेक्शनचा आकडा ओलांडला आहे. गदर'चं लाईफटाईम कलेक्शन 76.65 कोटी रुपये होतं.
तुम्हाला सांगतो की 'जाट'नं 9.5 कोटींची ओपनिंग केली होती. यानंतर, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.75 कोटी, चौथ्या दिवशी 15 कोटी आणि पाचव्या दिवशी 7.25 कोटी रुपये कमावले. चित्रपटानं सहाव्या दिवशी 6 कोटी, सातव्या दिवशी 4 कोटी आणि आठव्या दिवशी 4.15 कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचं एकूण कलेक्शन 61.65 कोटी रुपये होतं. या चित्रपटानं नवव्या दिवशी 4 कोटी, दहाव्या दिवशी 3.75 कोटी, अकराव्या दिवशी 5 कोटी आणि बाराव्या दिवशी 1.85 कोटी रुपये कमावले आहेत.
100 कोटींच्या बजेटमध्ये बनलाय 'जाट'
दरम्यान, 'गदर'चा विक्रम मोडल्यानंतरही, चित्रपटाला हिट होण्यासाठी अजूनही 20 कोटी रुपये आवश्यक आहेत. चित्रपटाचं एकूण बजेट 100 कोटी रुपये आहे आणि जर चित्रपट 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करू शकला नाही तर तो फ्लॉप ठरेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. चित्रपटात सनी देओलचा अभिनय जबरदस्त आहे. सनी देओलचा 'सॉरी बोल' हा डायलॉग सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























