एक्स्प्लोर
Advertisement
Irrfan Khan | तब्येत बिघडल्याने इरफान खान आयसीयूत, मृत्यूच्या अफवांबाबत परिवाराचं स्पष्टीकरण
अभिनेता इरफान खानची प्रकृती अचानक बिघडली असून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु आहेत.इरफानच्या मृत्यूसंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे त्याच्या परिवाराला त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. इरफानची प्रकृती अचानक बिघडली असून त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र इरफानच्या मृत्यूसंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे त्याच्या परिवाराला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या उलटसुलट अफवांमुळं त्याचा परिवार नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.
या पत्रकात म्हटलं आहे की, इरफानबाबत अशा प्रकारच्या अफवा अत्यंत असंवेदनशील आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अंदाज लावणं चूक आहे. आम्ही इरफानवर भरभरुन प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या लोकांप्रती आभारी आहोत. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा त्रासदायक आहेत. इरफान एक खंबीर व्यक्तीमत्व आहे आणि तो या आजाराचा सामना करत आहे, असं इरफानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही आपल्याला विनंती करतो की, अशा अफवा पसरवू नका. आम्ही आपल्याला इरफानच्या तब्येतीबाबत अपडेट देत राहू.
यापूर्वी इरफान खान परदेशात असल्याचे सांगण्यात येत होते, पण आता तो मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले आणि त्याला लॉकडाऊनमुळे जयपूरमध्ये आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे इरफानने आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले होते.
इरफान खानने 16 मार्च 2018 मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो, असं इरफाननं म्हटलं होतं.
त्यानंतर या आजारावर उपचार करण्यासाठी तो लंडनला गेला होता. दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला होता. आपल्या आजारातून सावरत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement