Hrithik Roshan : ‘ट्विटर’ने बनवली जोडी! ‘अशी’ सुरु झाली हृतिक रोशन-सबाची प्रेमकहाणी...
यापूर्वी हृतिक रोशन आणि सबा आझाद एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर भेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली.

Hrithik Roshan : बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दोघे अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर दिसले, तर कधी ते एकत्र लंच एन्जॉय करताना दिसतात. पण हृतिक रोशन आणि सबा आझाद पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण काही रिपोर्टनुसार, हृतिक आणि सबाची मैत्री सोशल मीडियावरून सुरू झाली आहे.
वास्तविक, यापूर्वी हृतिक रोशन आणि सबा आझाद एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर भेटल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली. बीटीच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशन आणि सबा गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
अशी झाली सुरुवात!
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये सबा आणि एक रॅपर होते, तेव्हापासून त्यांची मैत्री सुरू झाली. सबाने हृतिकचे कौतुक केल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि त्यानंतर डीएमच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद सुरू झाला.
सबा एक चांगली गायिका आणि अभिनेत्री देखील आहे आणि दोघांचेही एकमेकांसोबत खूप चांगलं जमतं. अलीकडेच सबा हृतिक रोशनच्या कुटुंबासोबतही दर्जेदार वेळ घालवताना दिसली. समोर आलेल्या फोटोंमध्ये सबा आणि हृतिकही खूप खुश दिसत आहेत. दोघांनाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. आता हे दोघेही फक्त मित्र आहेत की, त्याहून अधिक, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून जाणून घ्यायचे आहे.
हेही वाचा :
- Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
- Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
- Samantha : नेटकऱ्याचा अजब सवाल ; समंथा म्हणाली, 'आधी गूगलवर सर्च कर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























