Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..
Joelle Rich : सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती.
![Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती.. Hollywood Actor Johnny Depp Is Dating Lawyer Joelle Rich Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/4c4b6bf1a87d3c45d3faa9fe0ac74f6b1663903143607373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Joelle Rich : मानहानीच्या खटल्यामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्यांची पूर्वपत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) जगभरात चर्चेत आले होते. या खटल्याचा निकाल अभिनेता जॉनी डेप याच्या बाजूने लागला होता. या निकालानंतर अभिनेता प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. पेज सिक्समधील रिपोर्टनुसार, या लंडनस्थित वकील तरुणीचे नाव जोएल रिच (Joelle Rich) आहे. वकील जोएल रिच विवाहित असली, तरी विभक्त झाली असून तिच्या घटस्फोटाचे प्रकरण अद्याप न्यायलयात प्रलंबित आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जोएल आणि जॉनी मागील बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही आपल्या नात्याबद्दल गंभीर असून, लवकरच ते पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘सन’ विरुद्धची केस सुरु असतानाच त्यांच्यामध्ये छान मैत्री झाली अन् कामाच्या बहाण्याने ते एकमेकांच्या जवळ आले. इथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आहे.
‘या’ व्यक्तीशीही जोडले गेले नाव!
या आधी जॉनी डेपचे नाव त्याच्या वकिलांच्या टीममधील कॅमिली वास्क्वेझ हिच्याशी जोडले गेले होते. कॅमिलीने एम्बर हर्ड विरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपने मिळवलेल्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आपल्याबद्दल सुरु असलेल्या अफवांवर थेट स्पष्टीकरण देत, कॅमिलीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
नेहमी जॉनीला दिला आधार!
जॉनी डेप (Johnny Depp) आणि एम्बर हर्ड यांच्यातील मानहानीचा खटला लढणाऱ्या टीममध्ये जोएल रिच हिचे नाव सामील नव्हते. मात्र, असे असतानाही ती अनेकदा कोर्टरूममध्ये हजर असलेली पाहायला मिळाली. वेळोवेळी सुनावणीला उपस्थित राहून तिने जॉनीला आधार दिला होता. इतकेच नाही तर, या खटल्यात विजय मिळवल्यानंतर ती जॉनी सोबत आनंद साजरा करताना दिसली होती. कोर्टरूम बाहेर येताच तिने कॅमिलीला आनंदाने मिठी देखील मारली होती. जोएला रिचचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
जोएल रिच (Joelle Rich) ही लंडनस्थित वकील असून, प्रमुख आंतरराष्ट्रीय कायदा कंपनी शिलिंग्जची भागीदार आहे. जोएल रिच हिने प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलचे यांच्या खटल्याचे देखील प्रतिनिधित्व केले होते. रिच प्रामुख्याने मानहानी, प्रायव्हसी आणि कॉपीराईट वादांचे खटले लढते.
संबंधित बातम्या
Johnny Depp : तब्बल चार वर्षांनंतर डिस्नीच्या लाईट शोमध्ये झळकला जॉनी डेपचा चेहरा! चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
Johnny Depp : मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनीने मानले चाहत्यांचे आभार! आता एम्बर हर्ड म्हणतेय...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)