एक्स्प्लोर

Johnny Depp : तब्बल चार वर्षांनंतर डिस्नीच्या लाईट शोमध्ये झळकला जॉनी डेपचा चेहरा! चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Johnny Depp : चार वर्षानंतर पुन्हा एकदा डिस्नीने जॉनी डेपचा चेहरा त्यांच्या लाईट शोमध्ये दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Johnny Deep : तब्बल सहा आठवडे चाललेल्या मानहानीच्या खटल्यातून आता अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) याची निर्दोष सुटका झाली आहे. पूर्व पत्नी एम्बर हर्ड हिने केलेल्या आरोपांमुळे जॉनी डेप याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या आरोपांमुळे त्याच्या हातातील सर्व कामं काढून घेण्यात आली होती. इतकंच नाही तर, डिस्नीची लोकप्रिय चित्रपट सीरीज ‘पायरट्स ऑफ कॅरेबियन’मधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, आता चार वर्षानंतर पुन्हा एकदा डिस्नीने जॉनी डेपचा चेहरा त्यांच्या लाईट शोमध्ये दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

डिस्नी लँडमध्ये दररोज होणाऱ्या खास लाईट शोमध्ये ‘पायरट्स ऑफ कॅरेबियन’चे व्हिडीओ दाखवण्यात आले. सोबतच या लाईट शोमध्ये तब्बल चार वर्षानंतर जॉनी डेपचा चेहरा ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ म्हणून झळकला आहे. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक चाहत्यांनी जॉनी डेपच्या नावाचा जयजयकार केला होता. तर, काहींना हे जॉनी डेपच्या पुनरागमनाचे संकेत वाटत आहेत. जॉनीला पुन्हा एकदा ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ म्हणून पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच चाहते आणि प्रेक्षक आतुर झाले आहेत. मात्र, यावर अजून कुठलेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

जॉनी डेपने जिंकला खटला!

हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यावर आता अखेर हा निकाल देण्यात आला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले.

सहा आठवडे चालला खटला!

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार साक्ष देत होते. साक्ष आणि वादविवाद अनेक तास सुरु होते. ज्युरीच्या सात सदस्यांनीही तासनतास चर्चा केली आणि त्यानंतर ज्युरी निर्णयावर पोहोचले.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Genelia Video: इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले
इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले
Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Singer Salim Kodathur: मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Embed widget