Happy Birthday Jaya Bachchan : रियलच नाही, तर रील लाईफमध्येही गाजली ‘जया-अमिताभ’ यांची जोडी!
Jaya Bachchan Birthday : आज जया बच्चन आपला 74वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Happy Birthday Jaya Bachchan : जया बच्चन (Jaya Bachchan) या केवळ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नाहीत, तर त्यांनी राजकारणातही आपले पाय रोवले आहेत. अभिनेत्री-राजकारणी जया बच्चन यांची ओळख करून देण्याची गरज नाही. त्या त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि त्यांनी अनेक वर्षे रुपेरी पडद्यावर राज्य केले आहे. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी झाला होता. आज जया बच्चन आपला 74वा वाढदिवस साजरा करत आहेत.
या वयातही जयाजी खूप उत्साही दिसतात. पती-अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडीपैकी एक आहे. खरं तर, पती-पत्नी असण्याव्यतिरिक्त, जया आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये जोडीदाराच्या भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयामुळे त्यांची जोडी चित्रपटांमध्येही चांगलीच पसंत केली गेली आहे.
बन्सी बिरजू
जया आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा 1972च्या ‘बन्सी बिरजू’मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट प्रकाश वर्मा यांनी दिग्दर्शित केला होता आणि हा एक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटात जया बच्चन ‘बन्सी’ आणि अमिताभ बच्चन ‘बिरजू’च्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटाच्या पटकथेत बन्सी ही एक वारांगणा आहे. पण, बन्सी आणि बिरजू प्रेमात पडतात आणि लग्न करतात. जया आणि अमिताभ यांच्या चांगल्या बाँडिंगमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
जंजीर
प्रकाश मेहरा दिग्दर्शित, ‘जंजीर’ 1973 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात जया आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केले. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात बिग बींनी पोलिसाची भूमिका साकारली होती आणि जया बच्चन एका भटक्या महिलेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात जया आणि अमिताभ यांची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. असेही म्हटले जाते की, याच सेटवर त्यांच्या जीवनात प्रेम फुलले आणि चित्रपटानंतर लगेचच त्यांनी लग्न केले.
चुपके चुपके
‘चुपके चुपके’ हा 1975 साली प्रदर्शित झाला आणि हा एक विनोदी चित्रपट होता. हा खरे तर बंगाली चित्रपट ‘छदमबेशी’चा रिमेक होता. उपेंद्रनाथ गांगुली यांच्या ‘छदमबेशी’ या बंगाली कथेवर आधारित हा चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात जया आणि अमिताभ या दोघांनी एकत्र काम केले होते. यात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जया बच्चन, ओम प्रकाश, उषा किरण, डेव्हिड अब्राहम चेउलकर, असरानी आणि केशतो मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील दोघांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.
अभिमान
‘अभिमान’ हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यात जया-अमिताभ बच्चन यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. शास्त्रीय संगीतकार पंडित रविशंकर आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर ठरला होता. ही कथा एका अशा माणसाची कथा होती, जो पहिल्यांदा आपल्या पत्नीला गायनात करिअर करण्यास तयार करतो. पण, जेव्हा नवऱ्यापेक्षा पत्नी जास्त लोकप्रिय होते, तेव्हा दोघांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर येते. या चित्रपटाने दोघांच्या अभिनयाला वेगळी ओळख दिली.
मिली
1975 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. या चित्रपटात अमिताभ ‘शेखर’च्या भूमिकेत आहेत, जे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीच्या अर्थात जया बच्चन यांच्या प्रेमात पडतात. जया आणि अमिताभ यांच्या अभिनयाने हा चित्रपट सदाबहार बनला, ज्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
शोले
1975 मध्ये रिलीज झालेला रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा सर्वात सदाबहार चित्रपटांपैकी एक आहे. जय-वीरूची मैत्री, अॅक्शन सीक्वेन्स आणि संवादांव्यतिरिक्त, शोले चित्रपट जया आणि अमिताभ बच्चन यांच्या क्युट केमिस्ट्री आणि जबरदस्त बाँडिंगसाठी देखील पसंत केला गेला. या चित्रपटात जया यांनी एका विधवेची भूमिका साकारली होती, जिच्यावर अमिताभ बच्चन प्रेम करतात.
हेही वाचा :