![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री
KGF 2 : 'केजीएफ 2' हा सिनेमा 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री For pre-booking of'KGF 2 start sale of 5000 tickets in 12 hours KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/08/d51a3c8ced9efaf4cad26255ff75f844_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KGF 2 : 'केजीएफ 2' (KGF 2) सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता या सिनेमाच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्री-बुकिंग सुरु झाल्यापासून 12 तासांत या सिनेमाने पाच हजारांहून अधिक तिकिटे विकली आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाची तिकिटे विकली गेल्याने हा सिनेमा अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असे म्हटले जात आहे.
'KGF' चा पहिला भाग 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कोरोनामुळे केजीएफच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. आता हा सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा कन्नड, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
यशच्या 'केजीएफ 2' सिनेमाची चाहते प्रतिक्षा करत आहेत. भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची क्रेझ आहे. 'केजीएफ 2' हा ग्रीसमध्ये प्रदर्शित होणारा पहिला दक्षिण भारतीय सिनेमा आहे. 'केजीएफ 2' शाहिद कपूरचा 'जर्सी' आणि विजयचा 'बीस्ट' या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
‘चिराग सेटवर जेवत नाही’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्याने शिकवला धडा! ‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरचा धमाल किस्सा...
Alia-Ranbir Wedding : आलिया भट्ट बनणार रणबीर कपूरची ‘नवरी’! ‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार लग्नाचा पेहराव!
Yami Gautam : ‘जेलर’ बनलेल्या यामीला पाहून कैद्यांनी शिक्षा वाढवून घेतली? ‘दसवी’च्या शूटचा भन्नाट किस्सा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)