Bharti Singh : माफी मागितल्यानंतरही भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल! पाहा नेमकं प्रकरण काय?
आता भारतीच्या (Bharti Singh) विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
![Bharti Singh : माफी मागितल्यानंतरही भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल! पाहा नेमकं प्रकरण काय? fir against comedian bharti singh in punjab over dadhi mooch commen Bharti Singh : माफी मागितल्यानंतरही भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल! पाहा नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/ca4c396aba3c9d669301c51ee14b5557_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या (Bharti Singh) विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळते. वेगवेगळ्या कॉमेडी शोमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. सोशल मीडियावर देखील भारती वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच एक व्हिडीओ भारतीनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमामधून भारतीनं प्रेक्षकांची माफी मागितली. पण आता भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल
भारतीनं केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केले शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीनं (SGPC) भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. एसजीपीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारती सिंहच्या वक्तव्यावर शीख समुदायाचे लोक प्रचंड संतापले आहेत. कॉमेडियन भारती सिंहने SGPC शीखांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. रविदास टायगर फोर्सचे प्रमुख जस्सी तल्लन यांच्या तक्रारीवरून जालंधरमधील आदमपूर पोलीस ठाण्या भारतीच्या विरोदात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारतीनं का मागितली माफी?
काही दिवासांपूर्वी भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दाढी आणि मिशीवर कमेंट करताना दिसली. ती म्हणते, 'मिशी का नको? दाढी आणि मिशाचे बरेच फायदे आहेत. दूध पित असाल तर तोंडामध्ये शेवयांची टेस्ट लागते. माझ्या बऱ्याचं मित्रांची दाढी आहे. ते दिवसभर दाढीतील उवा काढतात.' त्यानंतर भारतीनं एक व्हिडीओ शेअर करुन प्रेक्षकांची माफी मागितली. ती म्हणाली, 'मी कोणत्याही धर्माबाबत काही म्हणाले नाही. तुम्ही तो व्हिडीओ पाहू शकता. मी माझ्या मित्रांसोबत मस्ती करत होते. पण जर माझ्या या बोलण्याचं कोणाला वाईट वाटले असेल. तर मी सर्वांची माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे. मला पंजाबी असण्याचा अभिमान वाटतो. '
‘द खतरा खतरा शो’ या शोमधून सध्या भारती सिंह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फराह खान करते.
हेही वाचा :
- Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)