एक्स्प्लोर
Advertisement
Poonam Pandey | लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेच्या विरोधात गुन्हा
पूनम पांडे काही ना काही कारणांनी नेहमी चर्चेत असते. लॉकडाऊनच्या काळात ती आपल्या बोल्ड अंदाजातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत असते.
मुंबई : नेहमी चर्चेत असणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबईसह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदी लागू असताना देखील मुंबईच्या रस्त्यावर अनेकजण विनाकारण भटकत असताना दिसत आहेत.
अशाच प्रकारे विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद हा बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले.
त्यांच्याकडे विचारणा केली असता बाहेर फिरण्याबाबत त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. मरीन लाईन पोलिसांनी यामुळे पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची गाडी देखील ताब्यात घेतली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर पूनम पांडेनं एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं म्हटलं आहे की, मला अटक झाल्याबद्दल वृत्त आलं आहे. मात्र तसं काही झालेलं नाही. मी घरी आहे. मी ठीक आहे आणि सेफ आहे. काही सामान आणण्यासाठी मी काल सायंकाळी बाहेर गेले होते, मात्र अटक झालेली नाही, असं तिनं सांगितलंय.
नेहमी चर्चेत असते पूनम पांडे
पूनम पांडे काही ना काही कारणांनी नेहमी चर्चेत असते. लॉकडाऊनच्या काळात ती आपल्या बोल्ड अंदाजातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत असते. 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघ जिंकला तर नग्न होण्याची घोषणा करुन तिने खळबळ उडवून दिली होती.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काल राज्यातला कोरोना पॉझिटिव्ह आकडा 22 हजार 171 वर गेला. त्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 13,739 रुग्ण आहेत. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहून सर्वत्र लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. असं असताना देखील काही लोक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement