Entertainment: रावणाच्या भूमिका करणाऱ्या या 3 अभिनेत्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांना घालतात भुरळ, या सिनेमांनही केली अनोखी जादू
सैफ अली खान पासून अभिषेक बच्चनपर्यंत बॉलीवूडच्या या 3 अभिनेत्यांनी रावणावरून प्रेरित भूमिका आजवर निभावल्यात.
वाईटावर चांगल्याचा विजय हे विजयादशमीचा प्रतीक आहे. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला रावणाचा वध करून विजयी झाल्याचा मुहूर्त विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. मनोरंजन सृष्टीत आजवर अनेकांनी रावणाच्या आणि रामाच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सैफ अली खान पासून अभिषेक बच्चनपर्यंत बॉलीवूडच्या या 3 अभिनेत्यांनी रावणावरून प्रेरित भूमिका आजवर निभावल्यात. कोणत्या चित्रपटांमध्ये व सीरिजमध्ये या अभिनेत्यांच्या भूमिका होत्या. पाहूयात.
अभिषेक बच्चन
अभिनेता अभिषेक बच्चन यांना मणिरत्न यांच्या रावण या चित्रपटात नकारात्मक भूमिका केली होती. या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा रावणासारखीच होती. या चित्रपटाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर खोलवर उमटली आहे. तसेच ब्रिथ इंटू द शाडोज या मालिकेत त्याने व ठरवलेली भूमिका ही रावणाच्या दहा स्वभावांच्या विकृतीमधून आलेली होती.
सैफ अली खानचा आदिपुरुष गाजला
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान ने ओम राऊतच्या आदिपुरुष मध्ये रावणाची भूमिका वठवली होती . या चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली होती तर कृती सेनन सीतेच्या भूमिकेत होती. सदोष स्क्रिप्ट बालिश संवाद आणि सरासरी पेक्षा कमी व्हीएफएक्स साठी या चित्रपटावर मोठी टीका झाली होती. सैफ अली खानच्या व्यक्तिरेखेवरही प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली होती.
अर्जुन रामपाल
शाहरुख खान स्टार असलेला रावण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन रामपाल दिसला. या चित्रपटातील त्याच्या पात्राचे नावही रावनच होते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन रामपालची व्यक्तिरेखा रावणावरच आधारित होती.
दिल्ली ६ मध्येही रावणदहनाभोवती फिरते कथा
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या 'दिल्ली 6'मध्ये अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातही एक खास प्रकारचा रामलीला सीन पाहण्यात आला आहे, ज्यामध्ये राम आणि रावण या दोघांची पात्रे दाखवण्यात आली आहेत. हा चित्रपट राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला असून त्याची कथा दिल्लीच्या रस्त्यांवर फिरते.
दुर्गापूजेभोवती फिरणारा कहानी हिट
विद्या बालनच्या 'कहानी' या चित्रपटात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आलाय. कथेत, विद्याचे पात्र कोलकाता येथे दुर्गापूजेदरम्यान तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेते. कथा जसजशी पुढे सरकते तसतशी विद्याला तिच्या पतीच्या मृत्यूमागील गुन्हेगाराचा शोध लागतो. हा शोध त्याला विजयादशमीच्या दिवशी त्या व्यक्तीसमोर आणतो.