Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Jul 2023 04:59 PM
Kajol: 'मी तिच्या जागी असते तर मी चप्पल काढली असती...'; पापाराझीबद्दल काजोलनं केलेल्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
निसा आणि पापाराझी यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये काजोलला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला काजोलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. Read More
Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार
Kedar Shinde : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाबाबत दिग्दर्शक केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Telly Masala : "कुन्या राजाची गं तू रानी" मालिकेला नेटकरी करतायत ट्रोल ते 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. Read More
Aamir Khan : आमिर खान कमबॅक करण्यासाठी सज्ज! राजकुमार हिरानींसोबत करणार बायोपिक
Aamir Khan : आमिर खान रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. Read More
Kriti Sanon: क्रिती सेनन झाली निर्माती; 'दो पत्ती'ची केली घोषणा, 8 वर्षानंतर काजोलसोबत करणार काम
क्रितीनं (Kriti Sanon) तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला नवा विक्रम! 'जवान' अन् 'डंकी'ने रिलीजआधी केली 500 कोटींची कमाई
Shah Rukh Khan : शाहरुख खानचे 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. Read More
Kunya Rajachi Ga Tu Rani: 'इमलीची कॉपी...'; "कुन्या राजाची गं तू रानी" मालिकेला नेटकरी करतायत ट्रोल
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं आहे. Read More
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; अभिनेत्रीच्या वडिलांनी होणाऱ्या जावयासाठी ठेवली 'ही' अट
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहल शिदम घराघरांत पोहोचली आहे. Read More
Me Honar Superstar Chhote Ustaad-2: "मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद 2" मधील छोटे उस्ताद सादर करणार पावसाची गाणी; प्रोमो व्हायरल
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमामधील छोटे उत्साद हे पावसावर आधारित असणारी गाणी सादर करणार आहेत. Read More
Bawaal Teaser: रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या 'बवाल' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज
वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor)यांच्या 'बावल' (Bawaal) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. Read More
Mr And Mrs Mahi : माहीच्या आयुष्यावर पुन्हा एक चित्रपट; धोनीची भूमिका कोण साकारणार? चाहते उत्सुक
Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Tejashree Pradhan: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; या गोजिरवाण्या घरात मालिकेतून केलं पदार्पण, जाणून घ्या तेजश्री प्रधानबद्दल
Tejashri Pradhan: तेजश्रीच्या बालपणाबद्दल आणि तिच्या पहिल्या मालिकेबद्दल जाणून घ्या... Read More
Kangana Ranaut : प्रतीक्षा संपली! कंगना रनौतच्या 'तेजस'ची रिलीज डेट समोर; वैमानिकेच्या भूमिकेत झळकणार 'पंगाक्वीन'
Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Pawan Kalyan : पहिलं लग्न 11 वर्षे, दुसरं दोन, तिसरं 10; तीन वेळा थाटला संसार, आता पवन कल्याण तिसऱ्या पत्नीपासून घेणार घटस्फोट
Pawan Kalyan : दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण आता तिसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More
Samantha Ruth Prabhu: समंथाचा मोठा निर्णय; अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक, निर्मात्याचे पैसेही दिले परत
सामंथा (Samantha Ruth Prabhu)   ही अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेणार आहे. Read More
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर राहुल मोदीच्या प्रेमात पडली? अभिनेत्री कोणाला करतेय डेट? जाणून घ्या...
श्रद्धा आणि राहुल हे एकमेकांना डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. Read More
Shah Rukh Khan : अमेरिकेत झालेल्या अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला; मुंबई विमानतळावर पत्नी गौरीसोबत स्पॉट
Shah Rukh Khan : अपघातानंतर किंग खान मायदेशी परतला असून मुंबई विमानतळावरील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुकामूळ घालत आहे. Read More
72 Hoorain : '72 हुरैन'च्या निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल; मुस्लिम समाजाची प्रतीमा चुकीची दाखवल्याचा आरोप
72 Hoorain : '72 हुरैन' हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.