Samantha Ruth Prabhu: समंथाचा मोठा निर्णय; अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक, निर्मात्याचे पैसेही दिले परत
सामंथा (Samantha Ruth Prabhu) ही अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेणार आहे.

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) 'पुष्पा' या चित्रपटामधील गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. समंथानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु गेल्या काही काळापासून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरताना दिसत आहेत. आता चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर सामंथाने मोठा निर्णय घेणार आहे. ती अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेणार आहे.
समंथा ही गेल्या एक महिन्यांपासून तिच्या आरोग्याच्या संबंधित काही समस्यांचा सामना करत आहे. तरी देखील समंथा ही काम करत होती. एका रिपोर्टनुसार, समंथा आता अभिनय क्षेत्रातून जवळपास एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या तब्येतीची विशेष काळजी घेणार आहे. यासोबतच मायोसिटिसवरही उपचार घेणार आहे.
प्रोड्युसरचं पेमेंट समंथानं दिलं परत
रिपोर्टनुसार, सिटाडेल आणि खुशी या चित्रपटांनंतर समंथाचा कोणताही नवीन बॉलिवूड किंवा साऊथ चित्रपट साइन करण्याचा कोणताही विचार नाही. खुशी चित्रपटानंतर ज्या प्रोजेक्ट्सवर ती काम करणार होती त्या प्रोजेक्ट्सच्या प्रोड्युसरनं दिलेले अॅडव्हान्स पेमेंटही तिने परत केलं आहे.
समंथानं सर्बियामध्ये वरुण धवनसोबत सिटाडेल इंडियाचे शूटिंग केले. त्यानंतर समंथा सध्या विजय देवरकोंडासोबत 'खुशी' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. ज्यानंतर समंथा ही त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे. ती अभिनयक्षेत्रातून एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
समंथाचा झालाय घटस्फोट
समंथा (Citadel) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असते. ‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि अभिनेता नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. त्यानंतर काही वर्षांनी ते विभक्त झाले.
समंथा ही सोशल मीडियावर तिच्या आगामी प्रोजोक्ट्सची माहिती देत असते. समंथाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
