Kunya Rajachi Ga Tu Rani: 'इमलीची कॉपी...'; "कुन्या राजाची गं तू रानी" मालिकेला नेटकरी करतायत ट्रोल
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं आहे.
Kunya Rajachi Ga Tu Rani: लवकरच कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं आहे. नेटकरी कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेला का ट्रोल करत आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोला 'माझ्यामुळं सहरी बाबूचा जीव वाचनार आसल तर…' असं कॅप्शन देण्यात आलं. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कबीर हा फोटो काढत आहे आणि गुंजा त्याला गावातील विविध ठिकाणं दाखवत आहे. त्यानंतर जोरदार पाऊस पडतो. पाऊस पडत असल्यामुळे गुंजा आणि कबीर हे एका घरात जातात. गावकरी गुंजाला शोधण्यासाठी तिथे येतात. त्यानंतर गावकरी गुंजा आणि कबीर यांना लग्न करण्याचा आग्रह करतात. हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'इमली या हिंदी मालिकेची ही कॉपी आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, नवीन काही सुचत नाही का तुम्हाला फक्त इकडचं तिकडचं कॉपी करता.'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
अभिनेता हर्षद अतकरी हा कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तो या मालिकेत कबीर ही भूमिका साकारत आहे. तरअभिनेत्री शर्वरी जोग देखील या मालिकेत काम करत आहे. दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमधून हर्षद अतकरी हा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता तर शर्वरीनं जीव झाला येडापिसा या मालिकेत काम केलं होतं. आता या दोघांच्या कुन्या राजाची गं तू रानी ही मालिका 18 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: