(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejashree Pradhan: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; या गोजिरवाण्या घरात मालिकेतून केलं पदार्पण, जाणून घ्या तेजश्री प्रधानबद्दल
Tejashri Pradhan: तेजश्रीच्या बालपणाबद्दल आणि तिच्या पहिल्या मालिकेबद्दल जाणून घ्या...
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. तेजश्रीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. तेजश्रीच्या बालपणाबद्दल आणि तिच्या पहिल्या मालिकेबद्दल अनेकांना माहित नसेल, जाणून घेऊयात तेजश्री प्रधानबद्दल...
बालपणाबद्दल तेजश्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, माझं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं. आई, बाबा, मी आणि माझी बहिण, असं आमचं कुटुंब होतं. माझे आई-बाबा हे दोघेही नोकरी करत होते.'
पुढे तेजश्रीनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मी सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात करिअर करायचा विचार केला नव्हता. मला सायकलॉजी विषयाची आवड होती. मला counselor व्हायचं होतं. 14 वी पर्यंत मी सायकलॉजी विषयाचा आभ्यास केला. पण 14 वीला मला पहिला ब्रेक मिळाला. या गोजिरवाण्या घरात ही माझी पहिली सीरिअल मी 14 वीला असताना मिळाली. '
तेजश्री प्रधानला 'तुला कसा जोडीदार पाहिजे?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये तेजश्री प्रधानला विचारण्यात आला होता. त्यावेळी तेजश्री म्हणाली, 'जबाबदार, माझी बडबड ऐकणारा आणि लग्न या शब्दाचा रिस्पेक्ट करणारा असा मुलगा पाहिजे.'
View this post on Instagram
तेजश्रीनं या मालिकांंमध्ये केलं काम
लेक लाडकी या घरची,प्रेम हे,अग्गाबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं आहे. तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
तेजश्रीचे चित्रपट
झेंडा, लग्न पाहावे करुन, शर्यत या चित्रपटांमध्ये तेजश्रीनं काम केलं. ती साध्या काय करते या चित्रपटामधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तेजश्री ही तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. तेजश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तेजश्रीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
In Pics : तेजश्री प्रधानचं नवं रुप, मोहक हास्य, चाहते घायाळ