एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 6 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 6 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या 15 जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास 3' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत.

बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या बहुचर्चित 'आर्या' या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. लेडी डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा सुष्मिता सेन दिसणार आहे.

17:52 PM (IST)  •  06 Jul 2022

Govinda Net Worth : आलिशान बंगला, लक्झरी गाड्या...गोविंदा आहे कोट्यवधींचा मालक

Actor Govinda Net Worth : गोविंदाने (Govinda) 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि नृत्याने त्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या गोविंदाची क्रेझ कमी झालेली असली तरी गोविंदा नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता होता. सध्या तो पूर्वीसारखं काम करत नसला तरी आजही तो कोट्यवधींचा मालक आहे.

16:59 PM (IST)  •  06 Jul 2022

Vithala Tuch : 'तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..!; 'विठ्ठला तूच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vithala Tuch : सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेंचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' (Vithala Tuch) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

16:39 PM (IST)  •  06 Jul 2022

777 Charlie : '777 चार्ली'ने 25 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई; रक्षित करणार सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत

'777 चार्ली' (777 Charlie) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 20 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांत 80.48 कोटींची कमाई केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

15:56 PM (IST)  •  06 Jul 2022

Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावरकरांना मानवंदना, हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं : शरद पोंक्षे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या मुंबईतील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. भर पावसात एकनाथ शिंदे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. मंगळवारी एकनाथ शिंदेंनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यासंदर्भात अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

13:12 PM (IST)  •  06 Jul 2022

दिशानं रिजेक्ट केल्या या बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स

Disha Patani : अभिनेत्री  दिशा पाटनी (Disha Patani) ही लवकरच एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिशा तिच्या अभिनयानं आणि फिटनेसनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार, दिशानं काही बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. जाणून घेऊयात दिशानं रिजेक्ट केलेल्या बिग बजेट चित्रपटांबाबत...

वाचा सविस्तर बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget