777 Charlie Box Office Collection : चित्रपट पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे देखील डोळे पाणावले; पाहा रक्षित शेट्टीच्या ‘777 चार्ली’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
777 Charlie Box Office Collection : सध्या '777 चार्ली' (777 Charlie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
777 Charlie Box Office Collection : दाक्षिणात्य चित्रपट सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. '777 चार्ली' (777 Charlie) हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीनं (Rakshit Shetty) प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाहूयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
777 चार्ली या चित्रपटानं आत्तापर्यंत जगभारातील बॉक्स ऑफिसवर 47.25 कोटींची कमाई केली. तर कर्नाटकमध्ये या चित्रपटानं 33.25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी दहा कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या कथानकाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले भावूक
कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांनी 777 चार्ली हा चित्रपट पाहून भावूक झाले होते. बसवराज बोम्मई यांनी पाळलेल्या कुत्र्याचे गेल्या वर्षी निधन झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर बसवराज बोम्मई यांना त्यांच्या कुत्र्याची आठवण आली, असं त्यांनी सांगितलं होतं. '777 चार्ली' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे बसवराज बोम्मई यांनी कौतुक केलं.
के किरणराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. रक्षित शेट्टीसोबतच या चित्रपटामध्ये संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी, दानिश सैत आणि बॉबी सिम्हा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. रक्षित शेट्टी आणि जीएस गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
We run out of words to express our gratitude. We are beyond grateful to see Shri. @BSBommai , honourable Chief Minister of Karnataka accept our film with so much love ✨♥️ pic.twitter.com/cTqL8zWBbb
— 777 Charlie (@777CharlieMovie) June 14, 2022
‘777 चार्ली’ चित्रपटामध्ये ‘धर्मा’ या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो. धर्मा हा एकटा राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते. चार्ली हा एक लॅब्राडोर कुत्रा आहे. चार्लीची एन्ट्री झाल्यानंतर धर्माच्या आयुष्या जे काही घडते, ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.777 चार्ली हे चित्रपटाचे नाव या चित्रपटातील लॅब्राडोर कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :
- Shaktimaan Movie : 'हा' अभिनेता साकारणार 'शक्तिमान'ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग
- Marilyn Monroe, Blonde Teaser Out : झगमगाटी आयुष्यामागची दुःखद कहाणी, मर्लिन मुन्रोंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज!
- Shaktimaan Movie : 'शक्तिमान' चे 300 कोटींचे बजेट; मुकेश खन्ना म्हणाले, 'माझ्याशिवाय हा चित्रपट होऊच शकत नाही'