एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 25July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 25July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला

बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!

‘ब्लॅक पँथर’च्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

आलिया-रणबीरच्या 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे.

'द सॅंडमॅन'चा ट्रेलर आऊट

नेटफ्लिक्सवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशाच वेगळ्या विषयावर भाष्य करणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द सॅंडमॅन' असे या वेबसीरिजचे नाव आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

गौरी खानने चाहत्यांना दाखवली मन्नतची झलक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणेच गौरी खानदेखील लोकप्रिय आहे. गौरी खान सिनेमांत काम करत नसली तरी ती बॉलिवूडची एक नामांकित इंटीरियर डिजायनर आहे. तसेच ती शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसचे कामदेखील सांभाळते. 'मन्नत'चा एक-एक कोपरा गौरीने सजवला आहे. अशातच आता गौरीने 'मन्नत'मधील काही फोटो शेअर करत चाहत्यांना 'मन्नत'ची झलक दाखवली आहे.

17:16 PM (IST)  •  25 Jul 2022

Ranveer Singh : न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; भावना दुखावल्याचा आरोप

Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं तर काहींनी टीका केली. आता न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

16:27 PM (IST)  •  25 Jul 2022

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश खोटं बोलून पुन्हा नेहाला फसवणार?

मालिकेच्या विशेष भागात अविनाश परीचा ड्रायव्हर असल्याचे सत्य नेहासमोर आले आहे. अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य नेहाने यशला सांगण्याआधीच अविनाश यशला फोन करून सांगतो, "मी परीचा ड्रायव्हर अविनाश...मला कॅन्सर झाला आहे". त्यामुळे यश अविनाशला मदत करण्याचे ठरवतो.

16:04 PM (IST)  •  25 Jul 2022

'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट

Deepika Padukone First Look From Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

15:38 PM (IST)  •  25 Jul 2022

Vicku Kaushal, Katrina Kaif : कतरिनला-विकीला धमकी देणारा अवघ्या 5 तासांत अटकेत; सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

Vicku Kaushal, Katrina Kaif : अभिनेता  विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टोशनमध्ये एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. विकीची पत्नी कतरिना कैफला (Katrina Kaif)  एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. विकीनं सकाळी सहा वाजता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली. अवघ्या पाच तासांमध्ये सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली.  मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे. उद्या वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करणार आहेत. 

वाचा सविस्तर बातमी

14:58 PM (IST)  •  25 Jul 2022

Darlings Trailer : 'डार्लिंग्स' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; पतीच्या अत्याचाराविरोधात लढणाऱ्या पत्नीची कहाणी

Darlings Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  आलिया भट (Alia Bhatt) तिच्या अभिनयानं सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील आलिच्या अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. आता लवकरच आलियाचा 'डार्लिंग्स' (Darlings) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियानं प्रमुख भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आलिया ही स्वत:च्या पतीचे अपहरण करुन पोलिसांकडे तक्रार करायला जाते. 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

पाहा ट्रेलर: 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget