Pathan : चार वर्षानंतर शाहरूख खान करतोय मोठ्या पड्यावर पुनरागमन ; 'पठाण' साठी घेतलं एवढं मानधन
25 जानेवारी 2023 रोजी पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Pathan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरूख खान (Shah Rukh khan) सध्या त्याच्या पठाण (Pathan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक गेली चार वर्ष उत्सुकतेनं करत होते. 25 जानेवारी 2023 रोजी पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण या चित्रपटासाठी या चित्रपटासाठी सलमान खाननं किती मानधन घेतले असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात त्याच्या मानधनाबाबत...
रिपोर्टनुसार, पठाण या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं. या चित्रपटात शाहरूखसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी देखील पठाण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता सलमान खान हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
पठाण चित्रपटाचे निर्माते यश राज फिल्म्स यांनी एक खास व्हिडीओ शेअर करून या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. व्हिडीओमध्ये शाहरूख, जॉन आणि दीपिका दिसत आहेत.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha