Vicku Kaushal, Katrina Kaif : कतरिना-विकीला धमकी देणारा अवघ्या 5 तासांत अटकेत; सांताक्रूझ पोलिसांची कारवाई
Vicku Kaushal, Katrina Kaif : सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली.मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे.
Vicku Kaushal, Katrina Kaif : अभिनेता विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. विकीची पत्नी कतरिना कैफला (Katrina Kaif) एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. विकीनं सकाळी सहा वाजता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली. अवघ्या पाच तासांमध्ये सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली. मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे. उद्या वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करणार आहेत.
मनविंदर सिंह हा सोशल मीडियावर कतरिनासोबतचे एडिट केलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होता. तो कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक देखील करत होता.आरोपीनं विकीला धमकी द्यायला सुरूवात केली. त्यानंतर विकीनं सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न केले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
कतरिना आणि विकीचे आगामी चित्रपट
अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे, हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफनं गेल्या सहा महिन्यात आशियातील सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रीटींच्या यादीत सातव्या स्थान मिळलं. अनेक नेटकरी कतरिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
हेही वाचा: