एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 23 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 23 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ

Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने केला नवा विक्रम; रविवारी सलग 22 तास प्रेक्षकांचं मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आता नवा विक्रम केला आहे.  या कार्यक्रमाचे 500 पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत. सध्या हा कार्यक्रम हास्यपंचमी करतो आहे. कारण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोम. ते शुक्र. रात्री 9 वाजता पाच दिवस पाहण्यास मिळतो आहे. आता रविवारी सलग 22 तास हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. 

23:55 PM (IST)  •  23 May 2022

Aditya Narayan : आदित्य नारायणने लाडक्या लेकीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो

 आदित्य नारायणने (Aditya Narayan) लाडक्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'त्विषा' असे आदित्य नारायणच्या मुलीचे नाव आहे. 'त्विषा' तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

23:53 PM (IST)  •  23 May 2022

सुमित राघवनने केलं योगी आदित्यनाथांचे कौतुक

अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असतो. एकीकडे त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकतेच सुमीत राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 

19:57 PM (IST)  •  23 May 2022

अमृता खानविलकरने घेतले ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अनेक मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या अमृता 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाने चांगली कमाई केल्याने अमृताने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. 

19:40 PM (IST)  •  23 May 2022

'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमाचा टीझर आऊट

चिरंतन राहणाऱ्या प्रेमावर भाष्य करणारा 'आठवा रंग प्रेमाचा' (Aathva Rang Premacha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

17:12 PM (IST)  •  23 May 2022

Timepass 3 : 'टाईमपास 3' सिनेमात हृता दुगुर्ळे मुख्य भूमिकेत

रवी जाधव यांचा 'टाईमपास 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात हृता दुगुर्ळे मुख्य भूमिकेत असणार आहे. तर प्रथमेश परब तिचा सहकलाकार असणार आहे. या सिनेमात हृताचा दबंग अंदाज पाहायला मिळणार आहे.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget