एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 16 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 16 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Makar Sankranti 2023 : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीनं दिल्या मकरसंक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा; शेअर केला खास व्हिडीओ

Makar Sankranti 2023 : आज देशभरात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साजरा होत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. पण या सगळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) लेकीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

महेश बाबूच्या लेकीचा म्हणजे सिताराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सितारा चाहत्यांना मराठीतून शुभेच्छा देताना दिसत आहे. ती म्हणत आहे,"मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला". 

Happy Birthday Sidharth Malhotra : 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ते शेरशाह; पहिलाच सिनेमा सुपरहिट! जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा फिल्मी प्रवास...

Sidharth Malhotra : सिने-अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थने 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमासाठी त्याला सिनेसृष्टीतील मानाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. 

करण जौहरच्या (Karan Johar) 'स्टुडन्ट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून सिद्धार्थच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने 'हसी तो फसी' या सिनेमात काम केलं. या सिनेमात तो परिणिती चोप्रा आणि अदाह शर्मासोबत झळकला होता. 

Bamboo : अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’? ट्रेलर आऊट

Bamboo Trailer Out : आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'बांबू' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे (Abhinay Berde) एका सर्वसामान्य मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाही. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळणार आहे. 

15:38 PM (IST)  •  16 Jan 2023

Chinmay Mandlekar: चिन्मयच्या 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित; चित्रपटा या दिवशी होणार रिलीज

Chinmay Mandlekar: आपल्या कसदार  लिखाणाने  आणि संयत अभिनयामुळे ओळखला  जाणारा अभिनेता  चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'आलंय  माझ्या राशीला' (Aalay Mazya Rashila) असं  म्हणतोय. तो असं  का म्हणतोय? त्याच्या  राशीला  नेमके  कोण आलंय? हा  प्रश्न  तुम्हाला ही पडला असेलच. या  प्रश्नाचे उत्तर  तुम्हाला 10  फेब्रुवारीला  प्रदर्शित होणाऱ्या आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित 'आलंय  माझ्या राशीला' या  मराठी चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.

13:35 PM (IST)  •  16 Jan 2023

Disha Vakani : 'तारक मेहता का...' मालिकेतील दयाबेन कोट्यवधींची मालकीण

TMKOC Dayaben Disha Vakani Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mahta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. यात दयाबेन (Dayaben) म्हणजेच दिशा वकानी (Disha Vakani) आघाडीवर आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

12:31 PM (IST)  •  16 Jan 2023

Apurva Nemlekar : 'Bigg Boss' संपल्यानंतर अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांनी दिली गुड न्यूज

Apurva Nemlekar : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) अपूर्वाने चांगलचं गाजवलं आणि ती या पर्वाची उपविजेती ठरली. आता बिग बॉस संपल्यावर लगेचच अपूर्वाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अपूर्वा लवकरच एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sujit Deshpande 🇮🇳 (@_sujit_v_deshpande_)

11:33 AM (IST)  •  16 Jan 2023

Critics Choice Awards 2023 : राजामौलींचा 'RRR' ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा!

Critics Choice Awards 2023 : एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe) पटकावल्यानंतर आता या सिनेमाने जगभरातील सिनेमांना मागे टाकत क्रिटिक्स चॉइस अवॉर्डवर (Critics Choice Award) आपलं नाव कोरलं आहे. 

10:56 AM (IST)  •  16 Jan 2023

Vijay Sethupathi Birthday: एकेकाळी फोन बुध ऑपरेटर, सेल्समन म्हणून केलं काम; साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती आहे कोट्यवधींचा मालक

Vijay Sethupathi: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतूपतीचा (Vijay Sethupathi) आज 45 वा वाढदिवस आहे. विजयचे चाहते विजयला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो फर्जी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये विजय हा शाहिद कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. विजय सेतूपतीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत आणि संपत्तीबाबत...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay Sethupathi (@actorvijaysethupathi)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्सSupriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहोChhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.