Vijay Sethupathi Birthday: एकेकाळी फोन बुध ऑपरेटर, सेल्समन म्हणून केलं काम; साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती आहे कोट्यवधींचा मालक
विजयनं (Vijay Sethupathi) साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
Vijay Sethupathi: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतूपतीचा (Vijay Sethupathi) आज 45 वा वाढदिवस आहे. विजयचे चाहते विजयला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो फर्जी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये विजय हा शाहिद कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. विजय सेतूपतीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत आणि संपत्तीबाबत...
अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्याआधी विजय सेतूपती करत होता हे काम
लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या विजयला त्याच्या कमी उंचीमुळे आणि चेहऱ्यामुळे कुठेही संधी मिळायची नाही. पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. तसेच विजय सेतूपतीनं फोन बुधवर ऑपरेटर म्हणून देखील काम केले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या थेनमुर्क परुवाकाटरू चित्रपटामध्ये पहिल्यांदा विजय सेतूपती यांना मोठा रोल मिळाला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑरेंज मिठाई या चित्रपटाचं विजय सेतुपतीनं लेखक आणि निर्माती केली आहे.
विजय सेतूपतीची संपत्ती
रिपोर्टनुसार, विजय सेतूपती हा जवळपास 110 कोटी संपत्तीचा मालक आहे. विजयचे 'विजय सेतुपति प्रॉडक्शन' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. विजय सेतूपती यांच्याकडे लग्झरी कार देखील आहेत.
View this post on Instagram
2003 मध्ये विजय सेतूपतीनं जेस्सीसोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांना श्रीजा आणि सूर्या ही दोन मुलं आहेत. पिज्जा, नादुवुला कोंजाम पक्काथा कानोम, सुधु कव्वम, सुपर डिलक्स, विक्रम वेधा, मास्टर या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Vijay Sethupathi: साऊथ स्टार विजय सेतूपतीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...