Entertainment News Live Updates: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Madhavi Nimkar: माधवी निमकरनं शेअर केला "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "काय तो आत्मविश्वास,काय तो राग..."
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात. त्यांच्या डन्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या डान्सच्या व्हिडीओला कमेंट्स करुन काही लोक त्यांचे कौतुक करतात. तर काही लोक त्यांना ट्रोल देखील करतात. नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी "रूप तेरा मस्ताना" या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्या आणि अविनाश यांना ट्रोल केलं. या ट्रोलरला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट
Amitabh Bachchan: आज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा वाढदिवस आहे. बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्कि 2898 AD (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या टीमनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. कल्कि 2898 AD या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकचा फोटो चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Tumbbad: "हस्तर" म्हणलं तरी आजही येतो अंगावर काटा; 'तुंबाड' ची पाच वर्षे, सिनेमातील प्रत्येक फ्रेम लक्ष वेधून घेणारी!
Tumbbad: काही चित्रपट असे असतात ज्यांचे मनात एक वेगळे स्थान असते. त्या चित्रपटांचे नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर पूर्ण चित्रपट उभा राहतो. असाच तुंबाड (Tumbbad) हा चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आज पाच वर्ष झाली आहेत. या चित्रपटाची एक-एक फ्रेम अनेकांच्या आजही लक्षात आहे. चित्रपटाची cinematography, चित्रपटाचे कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तुंबड या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वेनं (Rahi Anil Barve) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
View this post on Instagram
Sundara Manamadhe Bharli: “सुंदरा मनामध्ये भरली" साठी किती मानधन मिळालं? नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...
Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यु या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) या मालिकेमध्ये नंदिनी ही भूमिका साकारली. अदितीनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये अदितीनं नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अदितीनं चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Madhuri Pawar: "पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?"; भावाच्या निधनानंतर माधुरी पवारची भावूक पोस्ट
Madhuri Pawar: अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीचा अक्षय याचं 12 दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर माधुरीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच माधुरीनं या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
Saba Azad Trolled: 'दारु जास्त झाली का?'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Saba Azad Trolled: अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) (Hrithik Roshan) गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) ही नेहमीच चर्चेत असते. हृतिक आणि सबा हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये सबानं हजेरी लावली. या कार्यक्रमातील सबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इव्हेंटमधील सबाच्या एका व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी सबाला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
Sam Bahadur: "जिंदगी उनकी, इतिहास हमारा"; विकी कौशलनं शेअर केलं सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर, टीझर 'या' दिवशी होणार रिलीज
Sam Bahadur: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) हा सॅम बहादुर (Sam Bahadur) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामधील विकी हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतेच विकीनं सॅम बहादुर या चित्रपटाचे एक नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram