'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
Vedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
!['वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'Vedat Marathe Veer Daudle Saat' movie, Akshay Kumar as Shivaji Maharaj 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/801cd6245208d190bc5ec054e37658ad1667404447112384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात अक्षय कुमार याचा शिवाजी महाराज यांच्या वेषातील लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सिनेमात मला ही संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील दिवाळीमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल आणि या डिसेंबर महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज यांचं नाव येतंच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सिनेमे मागील काही काळात येतायत आणि ते प्रसिद्ध देखील होतं आहेत. अनेक संकटांवर मात करत महेश मांजेकर यांनी यश मिळवलं आहे. सिनेमात वीर मराठे आहेत आणि ध्येय वेढे देखील आहेत. ध्येय वेढे इतिहास घडवतात. आम्ही देखिल मागील साडे तीन महिन्यापूर्वी एक दौड केली. कुठं कुठं गेलो माहिती नाही मात्र आम्ही जनेतच्या मनातील बाब केली. राज ठाकरे आणि मी सतत एकत्र येतोय. मागच्या 10 वर्षातील बॅकलॉग भरुन काढत आहोत.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणजे आहेत की, वेडात मराठे वीर दौडले चाळीस याचे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, वेडात मराठे वीर दौडले सात, यात खरा वेडात दौडणारा हा महेश मांजरेकर आहे. वेडात मराठे वीर दौडले सात ही गोष्ट पाच वर्षांपूर्वी महेश मांजरेकर यांनी ऐकवली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होत, ही खूप भव्य गोष्ट आहे. कसं होणार मराठीमध्ये, मात्र आता मराठीमधला सर्वात मोठा हा चित्रपट येत आहे. दरम्यान, हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)