Anand Gandhi: 'काहीही साम्य नाही'; तुंबाड आणि कांताराची तुलना करणाऱ्यांवर भडकला दिग्दर्शक
तुंबाड (Tumbbad) आणि कांतारा (Kantara) या दोन्ही चित्रपटांची तुलना करणाऱ्यांवर आता दिग्दर्शक आनंद गांधी (Anand Gandhi) भडकला आहे.
Anand Gandhi: फक्त देशातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कांतारा (Kantara) या दाक्षिणात्य चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचं अनेकांनी कौतुक केलं. कांतारा या चित्रपटाची तुलना तुंबाड (Tumbbad) या चित्रपटासोबत अनेक लोक करत होते. या दोन्ही चित्रपटांची तुलना करणाऱ्यांवर आता दिग्दर्शक आनंद गांधी (Anand Gandhi) भडकला आहे.
आनंद गांधीचं ट्वीट
आता तुंबाड या चित्रपटाचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आनंद गांधी यानं तुंबाड आणि कांतारा या चित्रपटांबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'तुंबाड आणि कांतारा या चित्रपटांमध्ये काहीही साम्य नाही. भयपटाच्या माध्यमातून विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती हे लोकांसमोर आणणे, हा माझा तुंबाड चित्रपटाची निर्मिती करण्यामागील उद्देश्य होता. पण कांतारामध्ये या दोन्ही गोष्टींचा उदोउदो करण्यात आला आहे.'
Kantara is nothing like Tumbbad. My idea behind Tumbbad was to use the horror as an allegory of toxic masculinity and parochialism.
— Anand Gandhi (@Memewala) December 3, 2022
Kantara is a celebration of these.
तुंबाड हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार वर्ष झाली आहेत,तरी अजूनही अनेक लोक या चित्रपाटचं कौतुक करतात. काही फिल्म क्रिटिक्सनं या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीचं कौतुक केलं.
कांतारा हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनं केलं आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिका देखील ऋषभ शेट्टीनं साकारली आहे. ऋषभ शेट्टीसोबतच सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार या कलाकारांनी देखील कांतारा चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kantara Movie Review : मानव-निसर्गाच्या संघर्षावर गुंफलेला 'कांतारा'