Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/21/8b5fc2a1dbeb1de269d9b4eb3776668b1692589374610254_original.jpeg)
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ashok Saraf : यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना मिळणार; राज्य सरकार करणार केंद्राकडे शिफारस
पुणे : यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
Sharmishtha Raut: शर्मिष्ठासाठी तेजस गिरगाव सोडून ठाण्याला झाला शिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा
प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शर्मिष्ठाची ‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या मालिकेत दोन बहिणींचे नाते दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी आदेश बांदेकर यांनी या कलाकारांनी विविध प्रश्न विचारले.
नुकताच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आदेश बांदेकर हे शर्मिष्ठाला प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तुला सगळं ठाण्यातच मिळालं?. यावर शर्मिष्ठा 'हो' म्हणते. त्यानंतर आदेश बांदेकर विचारतात, 'कसं काय पण?' यावर शर्मिष्ठा म्हणते, 'माझा नवरा गिरगावचा आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं. तेव्हा माझी अट होती की, मी ठाणे सोडणार नाही. यावर तो म्हणाला होता, नो प्रॉब्लेम मी, ठाण्यात येतो. मग तो गिरगाव सोडून ठाण्यात होता.'
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update) यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.
Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ
Urvashi Rautela With Surya Kumar Yadav : बाॅलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडीयावर होत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत होती. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर, फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे. आता पुन्हा एकदा उर्वशी भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूसोबत दिसून आली आहे. मात्र तो ऋषभ पंत नसून क्रिकेटर सूर्यकुमार यादवसोबत आहे. या संबंधित व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही लवकरच ब्रँड एंडोर्समेंट आणि पार्टनरशिपसाठी एकत्र काम करणार आहेत.
Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ
Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट
Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
"दुध मांगोगे तो खीर देंगे,
— Atul Mohan (@atulmohanhere) August 20, 2023
कश्मीर मांगोगे तो लाहौर भी छीन लेंगे" - Major Pratap Singh
💥💥As promised, here's the BIG announcement💥💥
MAA TUJHE SALAAM 2 to go on floors soon. Get ready for another patriotic, action entertainer...coming soon in CINEMAS!#MaaTujheSalaam2… pic.twitter.com/QWHV1ncsFp
Apurva Nemlekar : अण्णांची शेवंता आता दिसणार ग्लॅमरस भूमिकेत; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री
Apurva Nemlekar Entry In Premachi Gosta Serial : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosta) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि राज हंचनाळे (Raj Hanchnale) मुख्य भूमिकेत आहेत. तर आता या मालिकेत अण्णांची शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरची (Apurva Nemlekar) एन्ट्री होणार आहे.
View this post on Instagram
Apurva Nemlekar : अण्णांची शेवंता आता दिसणार ग्लॅमरस भूमिकेत; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री
Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"
Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत.
Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)