Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"
Salman Khan New Look : सलमान खानच्या गजनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत.
गजनी लूकमध्ये भाईजान स्पॉट
सलमान खान 20 ऑगस्टला मुंबईत एका पार्टीला गेला होता. त्यावेळी अभिनेत्याचा गजनी लूक पाहायला मिळाला. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानचा डॅशिंग लूक पाहून चाहत्यांना 20 वर्षांपूर्वीच्या भाईजानची आठवण झाली आहे.
सलमानच्या नव्या लूकवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
सलमान खानच्या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भाई का जलवा, भाईजान जवानचं प्रमोशन करत आहे, तेरे नाम अगेन, 'तेरे नाम 2'च्या तयारीला भाईजानने सुरुवात केली, 20 वर्षांपूर्वीचा सलमान पुन्हा पाहायला मिळाला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'तेरे नाम' आणि 'सुल्तान' सारख्या सिनेमांत सलमानचा गजनी लूक पाहायला मिळाला आहे.
View this post on Instagram
सलमान खान बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. नुकतचं त्याने 'बिग बॉस ओटीटी 2'चं (Bigg Boss OTT 2) शूटिंग पूर्ण केलं आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki jaan) या सिनेमात अभिनेता शेवटचा झळकला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडलेला.
सलमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Salman Khan Upcoming Project)
सलमान खानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणार असं म्हटलं जात आहे. या सिनेमात शाहरुख खानची (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'टायगर 3'सह सूरज बडजात्याच्या 'प्रेम की शादी' या सिनेमातही तो झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
