Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते बिगबॉसच्या घरातून बाहेर! कारण काय? पुन्हा घरात येणार का... नक्की मामला काय जाणून घ्या
याविषयीची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच कधी वादग्रस्त वक्तव्याने तर कधी विनोदी वाक्यांनी चर्चेत राहिलेले वकील गुणरत्न सदावर्ते नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याची चर्चा आहे. उच्च न्यायालयातील एका प्रलंबित केसमुळे त्यांना बाहेर पडावे लागल्याचं समजतंय. याविषयीची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणाची सध्या न्यायालयात केस सुरू असून गुणरत्न सदावर्ते त्यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीला ते गैरहजर राहिल्याने हायकोर्टाने विचारले असता इतर वकिलांनी ते बिग बॉस मध्ये जाऊन बसले असल्याची माहिती दिली. यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे खटला सुरू असताना सदावर्त एक बिग बॉसच्या घरात कसे जाऊ शकतात असा सवाल केला जात आहे.
बिगबॉसच्या घरात वापसी होणार की नाही?
दरम्यान बिग बॉस तक या पेजवरून करण्यात आलेली गुणरत्न सदावर्तेंच्या बिग बॉसच्या घरातून घेतला जाणाऱ्या एक्झिटवर नेटकरांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते नाही तर मजा नाही... घरातील एकमेव मनोरंजन करणारा स्पर्धक.. अशा पद्धतींच्या चर्चा नेटकरी करत आहेत. उच्च न्यायालयातील प्रलंबित खटला संदर्भात ते घरातून बाहेर पडल्याची चर्चा असून बिग बॉसच्या घरात ते वापसही येऊ शकतात अशी चर्चा आहे.
🚨 BREAKING! Gunratan Sadavarte has been taken out of the house for his case. He might join the show later. #BiggBoss18
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 14, 2024
खटल्याची सुनावणी तहकूब
मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिकाकर्ते असणारे गुण रत्न सदावर्ते हे खटला सुरू असतानाच बिग बॉस या रियालिटी शो मध्ये गेल्याने हायकोर्टाने नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. सदावर्ते यांनी या खटलाबाबत आपला युक्तिवाद सर्वात आधी घ्यावा यासाठी विनंती केली होती. पण आता तेच गायब झालेत असं हायकोर्टाने म्हटल आहे. राज्य सरकार तर्फे महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ आता युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान 19 नोव्हेंबर पर्यंत या केसची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.