Bigg Boss 18: बिगबॉसच्या घराला मिळाला पहिला कॅप्टन! भूत वर्तमान भविष्याला चालवण्याचा विशेषाधिकार कोणाकडे?
नव्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या कॅप्टन्सीसाठी टाईम गॉड हा टास्क नुकताच पार पडला. बिग बॉसनं घरातील सर्व सदस्यांना बिगबॉसनं ॲक्टिव्हीटी रुममध्ये बोलावले होते.
Bigg Boss 18 : बिगबॉसच्या घरात कॅप्टनसीची निवड करण्यात आली आहे. या कॅप्टनला बिगबॉसनं टाईम गॉड असं नाव दिलंय. नावाप्रमाणेच या घराचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळावर या कॅप्टनची हुकुमत राहणार आहे. कॅप्टनसीच्या विशेष अधिकारांसह या स्पर्धकाला आता खास पॉवरही मिळणार आहे. कोण आहे हा खेळाडू? काय आहे ही विशेष पॉवर?
नव्या एपिसोडमध्ये बिगबॉसच्या कॅप्टन्सीसाठी टाईम गॉड हा टास्क नुकताच पार पडला. बिग बॉसनं घरातील सर्व सदस्यांना बिगबॉसनं ॲक्टिव्हीटी रुममध्ये बोलावले होते. या टास्कनंतर एका सदस्याला वरदान मिळणार असल्याचं बिगबॉसनं सांगितलं. घराच्या वेळेवर नियंत्रण ठेवणारा हा टास्क असल्याचं सांगण्यात आल्यानंतर बिगबॉसनं एकापाठोपाठ एका सदस्यांना नावे घेण्यास सांगितलं जे टाईम गॉड होण्यासाठी योग्य नाहीत.
हे स्पर्धक पडले पहिल्या फेरीतच बाहेर
टाईम गॉड हा टास्क सुरु झाल्यानंतर पहिल्याच फेरीत ९ स्पर्धक टाईम गॉड होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले. यात गुणरत्न सदावर्ते, तजिंदर, शहजादा, सारा, चाहत, ईशा, करण आणि श्रुतीकाचाही समावेश होता. दुसऱ्या फेरीत मुस्कान, अविनाश, एलिस, विवियन, हेमा, रजत, नायरा आणि चुम बाहेर पडले. आणि बिगबॉसच्या घराला पहिला कॅप्टन मिळाला.
आफरिन खान ठरली कॅप्टन
जिओ सिनेमाच्या अधिकृत पेजवरून आफरिन खान कॅप्टन झाल्याची घोषणा करण्यात आली. या पोस्टमध्ये आता आफरिन बदलणार बिग बॉस च्या घराचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ... काय होणार याचा घरावर परिणाम असे लिहित ही पोस्ट केली आहे. दरम्यान कॅप्टन्सीसाठी घेण्यात आलेल्या टास्कनंतर घरातील सदस्यांमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं.
नायरा रजतमध्ये खडाजंगी
टाईम गॉड या टास्कनंतर घरातील नायरा आणि रजत दलालमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. नायरानं टास्कमध्ये रजत दलाल टाईम गॉड होण्यास पात्र नसल्याचं म्हटलं होतं. यावरून दोघांमध्ये मोठाच वाद झाला. दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आणि ॲलिस यांच्यातही लढत झाली. नायरा बॅनर्जी आणि रजत दलाल यांच्यात जोरदार भांडण झाले. यानंतर नायरा रडू लागली. त्यामुळं या दोघांच्या भांडणाची चांगलीच चर्चा होती.